दुबई। एशिया कप 2018 मध्ये उद्या (23 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने जर या सामन्यात 31 धावा केल्या तर तो पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये 500 धावांचा टप्पा पार करेल. असा पराक्रम याआधी 16 भारतीय खेळाडूंनी केला आहे.
पाकिस्तान विरुद्ध भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. त्याने 69 सामन्यात 2526 धावा केल्या आहेत.
रोहितने आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 36.7 च्या सरासरीने 469 धावा केल्या आहेत. यात त्याने 6 अर्धशतके केली आहेत. मात्र त्याला अजून पाकिस्तान विरुद्ध शतक करता आलेले नाही.
तसेच रोहित यावर्षीच्या एशिया कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध तर सुपर फोरमध्ये बांगलादेश विरुद्ध अर्धशतक केले आहे. त्याने या एशिया कपमध्ये आत्तापर्यंत 3 सामन्यात 158 धावा केल्या आहेत.
तसेच आत्ता भारतीय संघात खेळत असलेला एमएस धोनी पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 34 सामन्यात 55.90 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय
–अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली
–२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम
–एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक