---Advertisement---

2027चा वनडे विश्वचषक खेळणार का? पाहा काय म्हणाला रोहित शर्मा?

On: सोमवार, मार्च 10, 2025 10:00 PM
---Advertisement---

भारताने यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली. दरम्यान चर्चांना उधाण आलं होतं की तो वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल. पण रोहित शर्माने या चर्चांना आता शांत केलं आहे. त्यामुळे रोहित 2027चा वनडे विश्वचषक खेळणार का? यावर रोहित काय म्हणाला? याबद्दल आपण जाणून घेऊया. (India Won Champions Trophy Under Rohit Sharma Captaincy)

रविवारी (9 मार्च) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 76 धावांची विजयी खेळी खेळून रोहितने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या अटकळांना नकार दिला आणि म्हटले की कोणीही “अफवा पसरवू नयेत”.

रोहित फायनल सामन्यानंतर म्हणाला, “सध्या मी गोष्टी येतात तशा घेत आहे. खूप पुढे विचार करणे माझ्यासाठी योग्य होणार नाही. सध्या माझे लक्ष चांगले खेळण्यावर आणि योग्य मानसिकता राखण्यावर आहे. मी 2027च्या विश्वचषकात खेळेन की नाही? हे मला कोणत्याही रेषेत सांगायचे नाही. सध्या अशी विधाने करण्यात काही अर्थ नाही.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी माझ्या कारकिर्दीत नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे. मला भविष्याचा फार विचार करायला आवडत नाही आणि मी भूतकाळातही असे केले नव्हते. सध्या मी माझ्या क्रिकेटचा आणि या संघासोबत घालवलेल्या वेळेचा आनंद घेत आहे. मला आशा आहे की माझ्या सहकाऱ्यांनाही माझी उपस्थिती आवडेल. या क्षणी हेच महत्त्वाचे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीतून उचलबांगडी; आयसीसीने जाहीर केला संघ
“एकदा सुनील गावसकरने पाकिस्तानच्या भीतीने माघार घेतली होती”- इंजमाम उल हकचे वक्तव्य!
निवृत्तीच्या बातमीवर जडेजा गप्प; विजयानंतर रहस्यमय पोस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---