दिल्लीचे मैदान भारतीय खेळाडूंनी गाजवले. अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 36 वर्षात एकदाही दिल्लीत कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला. विशेष म्हणजे, या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर खास विक्रमही नोंदवला गेला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिल्या डावात 32 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावात 31 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा डाव खेळताच रोहितच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. रोहितने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300वा डाव खेळला. यासोबतच सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी विराजमान झाला.
रोहित शर्माच्या नावावर सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात 300 डावांनंतर 12871 धावा जमा झाल्या. या यादीत अव्वलस्थानी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने 300 डावांनंतर 13336 धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या स्थानी मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) असून त्याने 300 डावांनंतर 13322 धावा केल्या आहेत. यादीत चौथ्या स्थानी ग्रॅमी स्मिथ आहे. त्याने 12780 धावा केल्या आहेत. यानंतर पाचव्या स्थानी गॉर्डन ग्रीनिज (12419), सहाव्या स्थानी ऍलिस्टर कूक (12355), सातव्या स्थानी वीरेंद्र सेहवाग (12303) आणि आठव्या स्थानी डेविड वॉर्नर (12270) आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 डावांनंतर सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
13336 – सचिन तेंडुलकर
13322 – मॅथ्यू हेडन
12871 – रोहित शर्मा*
12780 – ग्रॅमी स्मिथ
12419 – गॉर्डन ग्रीनिज
12355 – ऍलिस्टर कूक
12303 – वीरेंद्र सेहवाग
12270 – डेविड वॉर्नर
रोहित शर्माचा असाही विक्रम
याव्यतिरिक्त रोहित शर्मा याच्या नावावर आणखी एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. कर्णधार म्हणून पहिले चार कसोटी सामने जिंकणारा रोहित हा एमएस धोनी याच्यानंतरचा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. (Rohit Sharma has Most runs as opener after 300 Innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वतःची 100वी कसोटी खेळताना पुजाराने मिळवून दिली विजय, याआधी अशी कामगिरी करणारे फक्त…
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही