इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये शुबमन गिल याने वादळी प्रदर्शन केले आहे. तर दुसरीकडे आपल्या अप्रतिम षटकारांसाठी ओळखला जाणाऱ्या रोहित शर्मा याची बॅट शांत आहे. क्वॉलिफायरसारख्या महत्वाच्या सामन्यातही रोहितने चाहत्यांची निराशाच केली. अवघ्या 8 धावा करून रोहित शुक्रवारी (26 मे) बाद झाला. या खेळीनंतर प्लेऑफ सामन्यांमधील त्याची आकडेवारी अधिकच खालावली. गुजरातने या सामन्यात मुंबईपुढे विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
इंडियन प्रीमियर लीग 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये गुजरातने 3 बाद 233 धावा केल्या. यात सर्वात मोठे योगदान शुमबन गिल (Shubman Gill) याचे राहिले. गिलने अवघ्या 60 चेंडूत 129 धावा कुटल्या. हंगामातील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि ऑरेंज कॅपदेखील मिळवली. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मोठे लक्ष्य गाठायचे असल्यामुळे कर्णधार मुंबईला चांगली सुरुवात मिळवून देईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण तसे होऊ शकला नाही. रोहितने 7 चेंडूत अवघ्या 8 धावा केल्या आणि विकेट गमावली.
तसे पाहिले तर रोहित शर्मा आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये नेहमीच अपयशी ठरला आहे. अंतिम सामने वगळता रोहितने एकदाही प्लेऑफमध्ये अर्धशतक केले नाहीये. 26 ही त्याची प्लेऑमधील सर्वोत्तम खेळी आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वॉलिफायर सामन्यातही तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. आयपीएल प्लेऑफमध्ये रोहितने आतापर्यंत 15 डावांमध्ये 9.50च्या सरासरीने एकूण 133 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 89.26चा होता. (Rohit Sharma has once again failed in the playoffs)
आयपीएल प्लेऑफ्समध्ये रोहित शर्माची आकडेवारी (फायनल वगळता)
डाव – 15
धावा – 133
सरासरी – 9.50
स्ट्राईक रेट – 89.26
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शो-मॅन’ शुबमन! क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडत झळकावले तिसरे शतक
आयपीएल 2023चा ऑरेज कॅप होल्डर बनला शुबमन गिल! आरसीबी कर्णधार पडला मागे