टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारतीय संघ आपल्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचला आहे. भारताचा उपांत्याफेरीचा सामना गुरूवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंडशी ऍडिलेड येथे होणार आहे. भारतीय संघाच्या या प्रवासात मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने महत्वपूर्ण डाव खेळले आहेत. त्याने नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघाविरूद्ध धमाकेदार अर्धशतके झळकावली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एका पत्रकार परिषदेत सूर्याचे तोंड भरून कौतूक केले आणि सांगितले की त्याला मोठ्या मैदानात खेळायला का आवडते.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एका पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबद्दल सांगितले की,”सूर्या असा फलंदाज आहे, ज्याला स्वत:वर दबाव घेऊन खेळायला आवडते. तुम्हा तर्क लावू शकता की तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे. त्याला स्वत:च्या पद्धतीने खेळायला आवडते. आमची धावसंख्या भलेही 2 बाद 10 असो किंवा 2 बाद 100,तो मैदानात येवून त्याच्या मर्जीनेच खेळतो.”
रोहित पुढे म्हटला की,”सूर्याने संघासाठी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आहे. तो मला एकदा म्हटलेला की मला मोठ्या मैदानावर खेळायला आवडते, कारण तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात गॅप्स बघायला मिळतात. कदाचित सूर्याचा खेळातानाचा स्वभावच असा आहे. यातूनच त्याचा बेधडकपणा दिसून येतो.” त्यानंतर रोहितने त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना म्हटले की,” मी आता पूर्णपणे तंदरुस्त आहे. सरावाच्या दरम्यान हाताला थोडीसे खरचटलेले. मात्र, आता मी ठीक आहे.”
भारतीय संघ 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरूद्ध ऍडिलेड येथे आपला उपांत्यफेरीचा सामना खेळेल. हा सामना जिंकून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे भारतीय संघांचे उद्दिष्ट असेल. या उपांत्य फेरीच्या साममन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानशी भिडेल. जर भारताला हा विश्वचषक जिंकायचा असेल सूर्याचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे. सूर्याने टी20 विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात 75च्या सरासरीने 225 धावा केल्या. या विश्वचषकात त्याच्या 3 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.(Rohit Sharma has said in press conference that Suryakumar plays as he wish)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनलच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाने घेतला भारतीय जेवणाचा आस्वाद; या स्पेशल रेस्टॉरंटची केली निवड
आख्ख्या स्पर्धेत शांत असलेली बाबरची बॅट सेमीफायनलमध्ये तळपली, फिफ्टी ठोकताच नावावर झाला जबरदस्त विक्रम






