नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.
रोहितने या सामन्यात ११४ चेंडूत १३४ धावा करताना १५ चौकार आणि ४ षटकार मारले. याबरोबर त्याच्या नावावर एक खास विक्रमही झाला.
त्याने सलग ७ वनडे मालिकांत एकतरी शतक केले आहे. गेल्यावर्षी झालेल्या चॅंपियन्स ट्राॅफीपासून हा सिलसिला सुरु झाला आहे.
चॅंपियन्स ट्राॅफीमध्ये रोहितने नाबाद १२३, श्रीलंकेविरुद्ध नाबाद १२४ आणि १०४, आॅस्ट्रिलियाविरुद्ध १२५, न्युझीलंडविरुद्ध १४७ पुन्हा श्रीलंकेविरुद्ध नाबाद २०८, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११५ तर गुरुवारी इंग्लंडविरुद्ध १०१ धावा केल्या.
याबरोबर सलग ७ मालिकांमध्ये एकतरी शतकी खेळी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. २०११-२०१२मध्ये विराट कोहलीने सलग ६ मालिकांमध्ये शतकी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–या वर्षी पहिल्या ६ महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारे ४ खेळाडू
–आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम
–भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही
–इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..