---Advertisement---

आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी

Rohit Sharma & his family visited Tirupathi Balaji Temple
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांतीवर आहे. भारतीय संघ संध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात टी-20 मालिका खेळत आहे. टी-20 मालिकेत रोहितसह विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली. अशातच रोहित शर्मा आपल्या कुटुंबाला घेऊन तिरुमला तिरुपतीला हजेरी लावली.

भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा 12 जुलै रोजी सुरू झाला. याठिकाणी वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमधील मालिका खेळल्या जाणार होत्या. त्यापैकी कसोटी आणि वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले होते. तर टी-20 मालिकेत थ्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत देखील रोहितने फक्त एकाच सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. पुढचे दोन्ही वनडे सामने आणि संपूर्ण टी-20 मालिका रोहित संघातून बाहेर राहिला. टी-20 मालिकेत रोहितसह विराट कोहली (Virat Kohli) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हेदेखील विश्रांतीवर आहेत.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1690632687676207106?s=20

टी-20 मालिका सुरू असताना रोहितसह खेळत नसेलले वरिष्ठ खेळाडू मायदेशात परतल्याचे समोर आले. अशातच रविवारी (13 ऑगस्ट) रोहित आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये रोहित आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरला एकत्र दिसत आहेत. माहितीनुसार हे फोटो तिरुमला तिरुपती देवस्थानचे आहेत. आगामी आशिया चषकापूर्वी रोहित आपल्या कुटुंबाला घेऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आल्याचे दिसते.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1690630798502920194?s=20

सोशल मीडियावर याविषयी वेगेवगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर संघाला आयर्लंड दौरा करायचा आहे. 30 ऑगस्ट पासून पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदात आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होत आहे. रोहित शर्मा या महत्वाच्या स्पर्धेशाठी सध्या तयारी करत असून कर्णधार म्हणून त्याच्याकडून चाहत्यांना असणाऱ्या अपेक्षा देखील अधिक आहेत. (Rohit Sharma & his family visited Tirupathi Balaji Temple)

महत्वाच्या बातम्या –
‘मी शाहीन सारखा गोलंदाज पाहिला नाही’, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
स्मृती मंधानाने संघाला दिला रोमांचक विजय, हॅटट्रिक करणारी गोलंदाज 9 धावांचा बचाव करू शकली नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---