आयपीएलच्या या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच चर्चेत आहे. सीझन सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं त्याला कर्णधारपदावरून हटवलं होतं. मात्र त्यामुळे त्याच्या फलंदाजीत मोठा बदल घडून आला आहे. आता तो प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करू लागलाय.
रोहित शर्मा एक सलामी फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून देतोय. ‘हिटमॅन’नं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 297 धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 30 चौकार आणि 18 षटकार निघाले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोहित आयपीएलच्या या हंगामात पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे!
रोहित शर्मानं या हंगामात पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एकूण 13 षटकार लगावले आहेत. तो केवळ राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पॉवर प्ले मध्ये षटकार लगावण्यापासून चुकला. त्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या बाबतीत इतर फलंदाज रोहितच्या आसपासही नाहीत. एकीकडे रोहित शर्मानं पॉवर प्लेमध्ये एकट्यानं 13 षटकार लगावले आहेत, तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सची संपूर्ण टीम मिळून केवळ 12 षटकार लगावू शकली आहे! चेन्नई सुपर किंग्जनं पॉवर प्ले मध्ये 11 षटकार लगावले आहेत. तर गुजरात टायटन्सनं 10, राजस्थान रॉयल्सनं 6 आणि पंजाब किंग्जनं केवळ 4 षटकार लगावले आहेत!
रोहित शर्मा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जातो ते काही उगीच नाही. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय खेळाडू आहे. त्यानं आतापर्यंत 250 सामन्यामध्ये 275 षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केवळ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये 357 षटकार आहेत. भारताकडून या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्यानं आतापर्यंत 248 षटकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?