---Advertisement---

जिगरबाज रोहित! हातातून रक्त येत असतानाही नाही सोडले मैदान, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 23, 2021 4:44 PM
---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये कसोटी आणि टी२० मालिका पार पडल्यानंतर आता वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून यजमान भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

मात्र भारताच्या पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्माला हाताच्या कोपराला दुखापत झाली. ही दुखापत किती गंभीर आहे आणि येत्या सामन्यात रोहितच्या सहभागावर त्याने परिणाम होणार का, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाहिये. मात्र ही दुखापत झाल्यावर देखील रोहितने आपली खेळी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या दुखापतीचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

रक्त येत असतानाही रोहित घेतला खेळण्याचा निर्णय 

त्याचे झाले असे की, भारताकडून सलामीला शिखर धवन आणि रोहित शर्मा ही नियमित सलामीवीरांची जोडी फलंदाजीला उतरली. त्यावेळी डावाच्या पाचव्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड गोलंदाजी करत होता. या षटकात वूडचा एक वेगवान चेंडू थेट रोहित शर्माच्या हाताला जाऊन लागला. यानंतर रोहितच्या हातातून रक्त देखील येऊ लागले होते.

त्यामुळे काही काळ रोहित वेदनेत असल्याचे दिसत होते. ज्यामुळे भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर देखील आले होते. त्यावेळी त्यांनी रोहितच्या जखमेला मलमपट्टी करून दिली. यांनतर कदाचित रोहित शर्मा मैदान सोडेल, असेच सगळ्यांना वाटले होते. मात्र रोहितने संघासाठी मैदान न सोडण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/pakas2009/status/1374281618911719427?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1374281618911719427%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Frohit-sharma-bleeding-hand%2F

फलंदाजीत नाही केली खास कामगिरी 

मात्र रोहितला त्यांनतर फलंदाजीत काही खास कामगिरी नाही करता आली. तो ४२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. बेन स्टोक्सने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ३८ षटकात भारताच्या ४ बाद १९७ धावा झाल्या होत्या. केएल राहुल ६ तर हार्दिक पंड्या ० धावांवर खेळत होते.

महत्वाच्या बातम्या:

Video: पंड्या कुटुंबासाठी भावूक क्षण; हार्दिककडून वनडे कॅप स्वीकारताना कृणालला आली वडिलांची आठवण

बडेमियाँ-छोटेमियाँ! भारताकडून क्रिकेट मैदानं गाजवलेल्या ३ भावांच्या जोड्या

भारत का इंग्लंड, वनडे मालिकेत कोण मारणार बाजी? इंग्लिश दिग्गजाने केली भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---