---Advertisement---

Rohit Sharma । भारताचा टी-20 कर्णधार रोहितच! आगामी मालिकेसह विश्वचषकात करणार संघाचे नेतृत्व

On: मंगळवार, जानेवारी 2, 2024 12:36 PM
Rohit Sharma Virat Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या एका वर्षात टी-20 क्रिकेटपासून लांब राहिला. पण आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याची भूमिका संघासाठी महत्वाची ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर रोहित टी-20 संघात पुनरागमन करणार का? असा प्रश्न मागच्या काही महिन्यांपासून उपस्थित होत होता. आता या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळताना दिसत आहे.

2023 या संपूर्ण वर्षात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एकही टी-20 सामना खेळला नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये रोहितने आपला शेवटचा टी-20 सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर वनडे विश्वचषक 2023च्या पार्श्वभूमीवर रोहित आणि विराट कोहली यांनी टी-20 क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत  रोहित टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताला मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध ही तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाला देत सांगितले गेले आहे की, “आम्ही (बीसीसीआय अधिकारी) रोहित शर्मासोबत दीर्घ चर्चा केली आहे. तो टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे.” म्हणजेच यावर्षी खेळला जाणारा टी-20 विश्वचषक भारतीय संघ नेतृत्वात जिंकण्याचा प्रयत्न करेल. मागच्या वर्षी वनडे विश्वचषकात रोहित कर्णधाराच्या रुपात यशस्वी ठरला. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभव मिळाला.

दरम्यान, काही दिवसांपासून रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, अशाही चर्चा सुरू होत्या. पण आता रोहित टी-20 फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा खेळणार, असे सांगितले जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये मागच्या वर्षभरात बहुतांश वेळा हार्दिक पंड्याने कर्णधाराची भूमिका पार पाडली. सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही टी-20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण संघाचा पुढचा टी-20 कर्णधार म्हणून हार्दिककडे पाहिले जात आहे.

डिसेंबर 2023मध्ये इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. पण त्याआधीच हार्दिकने रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून आपली वर्णी लावली. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. अशात आता आगामी टी-20 मालिका आणि टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व कोण करणार, हे सर्वांसाठीच औत्सुक्याचे ठरणार आहे. (Rohit Sharma is all set to lead India in the T20 series against Afghanistan and the T20 World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
चेन्नई क्विक गन्सने उडवला गुजरात जायंट्सचा धुव्वा, तेलुगू योद्धाकडून राजस्थान वॉरियर्सचा मोठा पराभव
Happy New Year 2024 । सर्वांना शुभेच्छा देताना जाफरकडून ‘या’ खेळाडूचा उल्लेख, टीम इंडियाला काढला चिमटा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---