2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात(India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समीतीने रोहित शर्माची (Rohit Sharma) सलामीवीर म्हणून भारतीय संघात निवड केली आहे. त्यामुळे आता या कसोटी मालिकेत रोहित सलामीला फलंदाजी (opener) करताना दिसू शकतो.
रोहितने याआधी कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणारा रोहित कसोटीत सलामीला येत कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पण भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने(Ajinkya Rahane) रोहित कसोटी सलामीवीर म्हणून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्याने एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की ‘तूम्हाला खरंच उत्तर हवे आहे का? मला अजून माहित नाही की रोहित सलामीला फलंदाजी करणार आहे. पण जर खरंच तो सलामीला फलंदाजी करणार असेल तर मी आनंदी आहे.’
‘मी वेस्ट इंडीजमध्येही म्हटलो होतो की रोहित सारख्या खास प्रतिभा असणाऱ्या खेळाडूला बेंचवर पहाणे कठिण आहे. त्याने खूप मेहनत घेतली आहे आणि जर त्याला संधी मिळाली तर मला खात्री आहे तो चांगली कामगिरी करेल.’
‘आपल्या सर्वांना माहित आहे त्याच्याकडे कौशल्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मानसिकता महत्त्वाची असते. वनडे क्रिकेटमध्ये तूम्हाला मैदानात जाऊन स्वत:लाच खंबीर पाठिंबा द्यावा लागतो. कसोटी क्रिकेटमध्ये जर दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतील, तर तूम्हाला त्यांना सन्मान द्यावा लागतो आणि नंतर चांगला खेळ करावा लागतो.’
तसेच रहाणे सध्या भारताकडून केवळ कसोटी क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याने म्हटले आहे की सातत्याने खेळण्याचा सराव असणे महत्त्वाचे असते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम
–धोनीला ‘त्या’ क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून आश्चर्य वाटले – युवराज सिंग
–सुरेश रैना म्हणतो, टीम इंडियाकडून ‘या’ क्रमांकावर करु शकतो फलंदाजी