---Advertisement---

धोनीचा सिक्स अन् भारतानं जिंकला पहिला टी-२० आशिया कप, रोहितही अशाच कामगिरीसाठी उत्सुक

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 12:22 PM
---Advertisement---

आशिया कप २०२२चा थरार लवकरच सुरू होणार आहे. ४ संघांची पात्रता फेरी २० ऑगस्टपासून ओमानमध्ये होणार आहे. येथे क्रमांक-१ संघाला मुख्य फेरीत भारत आणि पाकिस्तानच्या गटात स्थान मिळेल. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये मुख्य फेरीचे सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर संघाला एका गटात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे टी-२० स्पर्धेच्या दुसऱ्या गटात आहेत. फायनल ११ सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप दुसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. २०१६मध्ये बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच याचे आयोजन करण्यात आले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली होती.

यावेळी रोहित शर्मा आशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत धोनीप्रमाणे त्यानेही संघाला विजेतेपद मिळवून द्यावे अशी आशा आहे. २०१६च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ५ बाद १२० धावा केल्या होत्या. पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. प्रत्युत्तरात टीम इंडियाची स्थिती १३ षटकांत २ बाद १०२ धावा अशी होती. त्यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करत होते. वेगवान गोलंदाज अल अमीन हुसेन १४वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याने पहिल्या २ षटकात फक्त १० धावा दिल्या होत्या आणि रोहित शर्माला फक्त एका धावेवर बाद केले होते. अशा परिस्थितीत तो ओव्हर टर्निंग पॉइंट ठरणार होता.

दरम्यान, अल अमीनच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार धोनीने मिडविकेटवर षटकार ठोकून संघावरील दडपण कमी केले. दुसऱ्या चेंडूवर मिडविकेटवर शॉट खेळून धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने लाँग ऑफवर ३ धावा घेतल्या. आता पुन्हा धोनी फलंदाजीला आला होता. चौथ्या चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशएने चौकार लगावला. आता सर्वजण त्याच्याकडून सिक्सची अपेक्षा ठेऊन होतेृ. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने यापूर्वीच अशी कामगिरी केली होती. धोनीने चाहत्यांना निराश केले नाही आणि ५व्या चेंडूवर मिडविकेटवर षटकार खेचून संघाला विजेतेपद मिळवून दिले. तो ६ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला. संघाने १३.५ षटकांत लक्ष्य गाठले. या सामन्यात शिखर धवनने ६० धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स

‘शिखर धवनसोबत कोणता खेळाडू करणार ओपनिंग?’ माजी दिग्गजाने दिलंय उत्तर

कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---