कोलकता। रविवारी(28 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 47 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इडन गार्डन स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला 34 धावांनी पराभव स्विकारावा लागला. पण असे असले तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 सामने खेळणारा एकूण चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 100 आयपीएल सामन्यात नेतृत्व करताना 57 सामन्यात विजय आणि 42 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
याआधी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने एमएस धोनी, गौतम गंभीर आणि विराट कोहलीने खेळले आहेत. यामध्ये सर्वाधिक आयपीएल सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
त्याने आत्तापर्यंत 169 आयपीएल सामन्यात नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्याने 102 सामन्यात विजयही मिळवला असून तो आयपीएलमध्ये 100 पेक्षा अधिक विजय मिळवणारा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात कोलकताकडून ख्रिस लिन(54), शुभमन गिल(76) आणि आंद्रे रसलने(80*) अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 232 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यांनंतर 233 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईकडून हार्दिक पंड्याने तुफानी फटकेबाजी करताना 34 चेंडून 91 धावांची खेळी केली. पण त्याला शेवटी योग्य साथ न मिळाल्याने मुंबईला 20 षटकात 7 बाद 198 धावाच करता आल्या. यावेळी कोलकताकडून सुनील नारायण, गॅरी हर्नी आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच पियुष चावलाने एक विकेट घेतली.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू –
169 – एमएस धोनी
129 – गौतम गंभीर
108 – विराट कोहली
100 – रोहित शर्मा
74 – ऍडम गिलख्रिस्ट
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून ऍरॉन फिंचने मानले धोनी आणि कोहलीचे आभार
–आयपीएल २०१९: प्लेऑफचे सामने सुरु होणार या नवीन वेळेत
–९ वेळा नाणेफक हरल्यानंतर विराटने असे केले सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ