रविवारपासून (६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात मर्यादीत षटकांच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. ६ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे, तर ३ सामन्यांची टी२० मालिका १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकांदरम्यान भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा याच्या खांद्यावर असेल. तर, दुसऱ्या वनडेपासून केएल राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. तो पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित असणार आहे. दरम्यान, असा एक विक्रम आहे, जो केवळ रोहित आणि राहुल या दोघांच्याच नावावर आहे.
रोहित आणि राहुल यांनाच जमलेला विक्रम
रोहित (Rohit Sharma) आणि राहुल (KL Rahul) या दोघांनीच वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतके करण्याचा विक्रम केला आहे. यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करता आलेले नाही. (century against West Indies in all 3 formats)
रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२०मध्ये एक, कसोटीत दोन आणि वनडेत तीन शतके केली आहेत. तसेच केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मध्ये एक, कसोटीत एक आणि वनडेत एक अशी एकूण तीन शतके केली आहेत.
आता हे दोघेही वेस्ट इंडिजविरुद्ध नेतृत्त्वगटात असणार आहेत. दरम्यान भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघांचे नियमित कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून या दोघांचीही वेस्ट इंडिजविरुद्धची पहिलीच मालिका असणार आहे.
दरम्यान, केएल राहुल ६ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात अनुपस्थित असणार आहे. तो दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघात सामील होईल. माध्यमांतील वृत्तानुसार केएल राहुल बहिणीच्या लग्नामुळे पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित राहाणार आहे.
अधिक वाचा – भारत-विंडीज वनडे मालिकेचा मार्ग मोकळा! कर्णधार रोहितसह ‘हे’ खेळाडू सरावासाठी मैदानात
अशा होतील मालिका
भारत आणि वेस्ट इंडिज संघात ६ फेब्रुवारीपासून वनडे मालिका सुरु होईल. ६ फेब्रुवारीनंतर ९ आणि ११ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होईल. तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. वनडे मालिकेनंतर १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १८ आणि २० फेब्रुवारी रोजी पार पडेल. हे तिन्ही सामने कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! गाजावाजा केलेला २१ वर्षीय गोलंदाज निघाला ‘फेकी’; वाचा सविस्तर
एक दोन नव्हे, तर ७ आयपीएल संघांकडून खेळण्याचा विक्रम होऊ शकतो ‘या’ तीन भारतीयांच्या नावावर