सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात चौथ्या कसोटी सामना सुरू आहे. यादरम्यान दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत भारतीय संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील तिसऱ्या दिवसानंतर भारतीय नियामक मंडळने (बीसीसीआय) रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यातील चर्चेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये रोहित आणि पुजारा यांनी अनेक गोष्टींबद्दल चर्चा केल्याचे दिसते. या चर्चेवेळी रोहितने एका गोष्टीसाठी पुजाराचे चांगलेच पाय खेचले. या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात रोहित आणि पुजारा यांच्यात १५३ धावांची भागीदारी झाली होती. रोहित आणि पुजारा यांच्यातील उत्कृष्ट भागीदारीच्या सुरुवातीला पुजाराने रोहितला देखील स्ट्राइक रेटमध्ये मागे टाकले होते. ही गोष्ट रोहितच्या चांगलीच लक्षात राहिली.
रोहितने या सामन्यात आपले ८ वे कसोटीतील शतक केले आणि विदेशातील आपले पहिलेच शतक झळकवले. यासह रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानंतर रोहितसोबत चर्चा करताना पुजारा म्हणाला, “मी खूप खुश आहे की, आपण शतकी भागीदारी केली. मी आशा करतो की आपल्याकडून पुढेही अशाच शतकी भागीदारी होत राहतील. त्याचबरोबर मी हेही आशा करतो की, तू आणखी असेच शतक मारत राहो.”
यानंतर पुजाराच्या चांगल्या स्ट्राइक रेटबाबत पुजाराची टांग खेचत रोहित म्हणाला, “मी सुद्धा तुझ्यासाठी खूप आनंदी झालो आहे, पुजी (पुजारा). कोणीतरी मला सांगितले होते, की तू ५० चेंडूत ३५ धावा केल्या आहेत.” पुजाराने दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना चांगले आक्रमक शॉट मारले होते. साधारणत: पुजाराकडून अशा आक्रमक शॉटची अपेक्षा नसते. मात्र पुजाराने देखील या दरम्यान चांगली आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे रोहितने त्याची स्ट्राईक रेटवरून मजा घेतली.
यावर पुजारा म्हणाला, “याचे सर्व श्रेय तुम्हा दोघांना (रोहित आणि केएल राहुल) जाते. कारण तुम्ही एक चांगली सुरुवात करून दिली. तुम्ही दोघांनीही चेंडू जुना केला. ज्यामुळे मी चांगले शॉट खेळू शकलो. त्या सत्रात फलंदाजी करणे मला थोडे सोपे केले.”
रोहितने त्याच्या खेळीत केलेल्या बदलांबाबत देखील चर्चा केली त्याच्या मते त्याने आक्रमक खेळी ऐवजी संत गतीने खेळण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याने त्याच्या खेळातील शैली बदलल्याचे देखील स्पष्ट केले आणि यावर तो खूश असल्याचे देखील सांगितले.
यावर बोलताना रोहित म्हणाला, “खरे तर माझी भूमिका पूर्ण बदलली आहे. साधारणत: माझा लवकर धावा करण्यावर भर असतो. मात्र मी माझी भूमिका पूर्ण बदलली आहे, आता मी माझा पूर्ण वेळ देण्यावर भर देतो. या दौऱ्यापूर्वी माझ्या समोर एक मोठे आव्हान होते, ते म्हणजे मला जेवढे जास्तीत जास्त चेंडू खेळता येतील, तेवढे खेळायचे होते. जेवढा वेळ तुम्ही खेळपट्टीवर टिकून रहाल तेवढेच धावा येत राहतील. त्यामुळे मला जास्त वेळ टिकून खेळायचे होते.”
या दरम्यान मालिकेत पुजाराचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय ठरत होता. यामुळे पूजाराला अनेक टिकांना सामोरे देखील जावे लागले होते. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यात पुजाराने थोडी आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याने मोईन अलीच्या गोलंदाजीवर अनेक चांगले चांगले शॉट मारून दाखवून दिले की तो देखील आक्रमक खेळी करू शकतो. या सामन्यातील दुसऱ्या डावात पुजाराने ६१ धावा केल्या होत्या.
The Oval Diaries with Rohit & Pujara ????
Of role reversals, patience, putting up a century stand & scoring a maiden Test ton overseas – @ImRo45 chats up with @cheteshwar1???? ???? – by @RajalArora
Full interview ???? ???? #TeamIndia #ENGvIND https://t.co/uchiiJPyD7 pic.twitter.com/1zuuznpOVl
— BCCI (@BCCI) September 5, 2021
रोहितच्या १२७ धावा आणि पुजाराच्या ६१ धावांच्या जोरावर भारतीय संघाचा डाव सावरला दोघांनीही मिळून दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली. मात्र, टी-ब्रेक नंतर घेण्यात आलेल्या नवीन चेंडूवर ओली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर दोन्ही खेळाडूंची खेळी संपुष्टात आली.
त्यानंतर पुजाराने रोहितला विचारले की, या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या शतकाबद्दल विचार केला होता का? यावर बोलताना रोहित म्हणाला, “नाही… खरे सांगायचे झाले तर, मी याबद्दल अजिबात विचार केला नव्हता. कारण या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाही. नेहमी धावा करणे हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे राहिले आहे. मात्र या दरम्यान हे माझे विदेशातील पहिलेच शतक होते आणि हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मात्र, मला फक्त माझी चांगली खेळी करत राहायची आहे. मी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केली होती. माझे खेळणे अत्यंत महत्त्वाचे होते आणि अशी चांगली खेळी करण्यात मी यशस्वी झालो यामुळे मी अत्यंत खूश आहे.”
महत्वाच्या बातम्या –
–वेलकम होम मॅगी!! जोस बटलर दुसऱ्यांदा झाला ‘बाबा’, पाहा क्यूट फोटो
–ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू, जे आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ठरले अपयशी
–तुफानी फटकेबाजी! टी२० विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज






