आयपीएल हंगामात जखमी झालेल्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्या साठी वगळण्यात आले होते. यानंतर त्याच्या चाहत्यांनी निवड समितीवर टीकास्त्र डागले होते. जर रोहित शर्मा दुखापतीतुन सावरला तर त्याचा पुनर्विचार निवड समिती करेन असे अगोदरच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती ज्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे जागा मिळाली नाही. मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा तंदुरुस्त असल्याचे दाखले देण्यासाठी काही ट्विट तसेच पोस्ट सामाजिक माध्यमांवर केल्या. यानंतर रोहितने हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन देखील केले आहे. शिवाय रोहित शर्मा ‘प्ले ऑफ’ मध्ये मुंबईचे नेतृत्व देखील करणार आहे. यावरून तो दुखापतीतुन सावरला असल्याचे स्पष्ट होत आहे. आयपीएल संपताच भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार रोहित शर्माबाबत निवड समिती पुनर्विचार करून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात जागा देऊ शकते.
का आहे रोहित शर्मा महत्त्वाचा खेळाडू ?
रोहित शर्मा हा भारतीय संघाचा स्टार सलामी फलंदाज तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित संघाला उत्तम खेळ करून देतो. रोहित शर्माचे ऑस्ट्रेलिया विरुद्धचे आकडे देखील इतर खेळाडूंपेक्षा चांगले असल्याने एक अनुभवी खेळाडू म्हणून तो ह्या दौऱ्यावर असणे संघासाठी गरजेचे आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातच पहिले द्विशतक (209) झळकावले होते. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरोधात खेळलेल्या 40 सामन्यांत त्याने 2208 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतक त्याने ठोकली आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत ठोकलेल्या 29 शतकांपैकी सर्वाधिक 8 शतकं ही देखील ऑस्ट्रेलिया विरोधातच आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
-मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
-बिगुल वाजलं! प्ले ऑफमध्ये चार संघांचे स्थान निश्चित; ‘असे’ असतील क्वालिफायर आणि एलिमिनेटरमधील सामने
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का