इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसला. भारताच्या कर्णधाराने या सामन्यात आपला जुना फॉर्म दाखवत झंझावाती अर्धशतक ठोकले आणि भारतीय संघाला १८.४ षटकातच १० विकेट्सने हा सामना जिंकून दिला. या सामन्यादरम्यान रोहितच्या एका षटकाराचा चेंडू स्टेडियममधील छोट्या मुलीला जाऊन लागला होता. सामन्यानंतर रोहितने त्या मुलीची भेट पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
भारताच्या डावातील पाचव्या षटकादरम्यान रोहितच्या षटकारामुळे (Rohit Sharma Six) चिमुकली जखमी झाली होती. या षटकातील तिसऱ्या शॉट पिच चेंडूवर रोहितने पुल शॉट मारत षटकार खेचला. रोहित षटकार मारल्यानंतर वळला आणि नॉन स्ट्राईकवर असलेल्या धवनकडे जाऊ लागला. मात्र कॅमेरामनने सीमारेषेपर्यंत चेंडूचा पाठलाग केला. रोहितच्या षटकाराचा चेंडू सीमारेषेपलीकडे जाऊन स्टेडियममध्ये बसलेल्या दर्शकांमध्ये जाऊन पडला. तिथे असलेल्या एका छोट्या मुलीला (Little Girl Injured) हा चेंडू लागला आणि ती रडू लागली.
Rohit Sharma Pull shot 🥵🔥 hope so that little girl is fine 🤞 pic.twitter.com/ytdu7q9BWO
— name (@hitman450708) July 12, 2022
मग लगेचच त्या मुलीच्या जवळच्या लोकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. रोहित आणि इतर खेळाडू मैदानावरून हा प्रसंग पाहात होते. सामन्यादरम्यान रोहितला त्या मुलीची भेट घेणे शक्य झाले नसते. म्हणून त्याने सामना संपल्यानंतर त्वरित तिची भेट घेत तिची विचारपूस केली.
या मुलीचे नाव मीरा साल्वी असून रोहितच्या षटकाराचा चेंडू तिच्या पाठीवर लागला होता. मात्र या चेंडूमुळे तिला जास्त गंभीर दुखापत झाली नव्हती. स्वत: तिच्या वडिलांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली होती. तरीही, रोहित सामना संपल्यानंतर त्या मुलीला (Rohit Met Injured Girl) भेटायला गेला. त्याने जाताना आपल्यासोबत काही चॉकलेट्स आणि टेडी बियरही घेतले होते. त्याने या वस्तू त्या लहान मुलीला भेट दिल्या. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचा फोटो व्हायरल होत असून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
https://twitter.com/rohittv_45/status/1547059768757366785?s=20&t=nnztJII7UVdFN023UTqvzw
This girl was injured by Rohit's six.
#RohitSharma #ENGvsIND pic.twitter.com/iPc4H9OYBx— Dinesh Lilawat (@ImDL45) July 13, 2022
Rohit Sharma met the girl after the match who got injured by Rohit's six and gave her chocolate. Nice gesture by the Indian Captain 👏 pic.twitter.com/thFlfro1Bb
— Cricket is Love ❤ (@cricketfan__) July 13, 2022
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २५.२ षटकात ११० विकेट्सवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या ११४ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर १८.४ षटकातच सामना जिंकला. रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हेदेखील भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैदानातही आणि मैदानाबाहेरही डक’! बुमराहची पत्नी संजनाने इंग्लिश फलंदाजांना केले ट्रोल
‘एलेक्सा, प्लीज प्ले जसप्रीत बुमराह’, भारताच्या माजी क्रिकेटपटूच ट्वीट होतंय व्हायरल
इंग्लंडमधील भारतासाठी ‘हे’ मैदान ठरलयं लकी! झाली ऐतिहासिक विजयाची नोंद, वाचा सविस्तर