पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सने गुरुवारी (दि. 18) शानदार विजय मिळवला. हा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250वा सामना होता. एमएस धोनी नंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी नावावर झालेला रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. परंतू याच सामन्यात रोहित शर्माने आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याचा हा विक्रम मुंबई इंडियन्स संघासाठी आहे.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 35 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितने 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. या खेळीदरम्यान रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत 224 षटकार ठोकले आहेत. यापूर्वी हा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर होता. ( Rohit Sharma New Record Hits Most Sixes For Mumbai Indians In IPL )
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –
224 षटकार – रोहित शर्मा
223 षटकार – किरॉन पोलार्ड
105 षटकार – हार्दिक पांड्या
103 षटकार – इशान किशन
98 षटकार – सूर्यकुमार यादव
𝗧𝗪𝗢 𝗧𝗪𝗘𝗡𝗧𝗬 𝗙𝗢𝗨𝗥* – Most 𝕊𝕀𝕏𝔼𝕊 for MI 🤝 RS45#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #PBKSvMI pic.twitter.com/PLG0WLKsdW
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2024