दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईच्या फलंदाजीला मात्र खास सुरुवात झाली नाही. त्यांचा कर्णधार रोहित शर्मा पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
रोहितला फिरकीपटू आर अश्विनने शुन्यावर पायचीत बाद केले. रोहितची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही १३ वी वेळ आहे. त्यामुळे त्याने आता आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या पार्थिव पटेल आणि हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. पार्थिव आणि हरभजन देखील प्रत्येकी १३ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
विशेष म्हणजे रोहित, हरभजन आणि पार्थिव यांनी त्यांच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक सामने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले आहेत.
४ वेळा गोल्डन डकवर रोहित बाद –
आयपीएलमध्ये रोहित चौथ्यांदा पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद (गोल्डन डकवर) झाला आहे. त्याला आत्तापर्यंत उमेश यादव, जोफ्रा आर्चर आणि आर अश्विन यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले आहे.
विशेष गोष्ट अशी की आयपीएलमध्ये २०१८ च्या आधी रोहित कधीही गोल्डन डकवर बाद झाला नव्हता. पण २०१८ नंतर तो चारवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
रोहित पुन्हा अपयशी –
रोहित यंदाच्या आयपीएल हंगामात खास फॉर्ममध्ये दिसलेला नाही. तसेच त्याला या आयपीएल हंगामादरम्यान दुखापतही झाली, त्यामुळे तो काही सामन्यांना मुकला. पण त्याने ३ नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून दुखापतीनंतर पुनरागमन केले. मात्र हैदराबादविरुद्धही तो केवळ ४ धावाच करु शकला आणि आता दिल्लीविरुद्धही तो शुन्यावर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव
Video: विराटने चक्क तलवारीने कापला केक, पाहा बर्थडे सेलिब्रिशन
कहर चाहते! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलवर शोधत आहेत कोहलीचा नंबर
ट्रेंडिंग लेख –
आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!






