---Advertisement---

रोहित शर्माचे ते ३ विक्रम, जे कुणीही मोडू शकत नाही

---Advertisement---

२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केलेल्या रोहित शर्माने मागील काही वर्षात सलामीवीर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

२०११ च्या विश्वचषकात संधी न मिळालेल्या रोहितने २०१९ च्या विश्वचषकात तब्बल ५ शतके ठोकली. त्याचबरोबर वनडेमध्ये त्याने ३ द्विशतक करण्याचाही पराक्रम केला. त्याच्यानावावर असे काही विश्वविक्रम आहेत, ज्यांना तोडणे जवळजवळ अशक्य आहे. अशा विक्रमांचा घेतलेला आढावा –

रोहित शर्माचे हे तीन विक्रम मोडणे कठीण – 

१. वनडेमध्ये ३ द्विशतके – 

रोहित शर्माने वनडेमध्ये ३ द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत वनडेमध्ये केवळ ६ खेळाडूंना द्वशतक करण्यात यश आले आहे. त्यातील रोहित व्यतिरिक्त अन्य ५ खेळाडूंनी केवळ एकदा द्विशतक केले आहे.

रोहितने पहिले द्विशतक २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याने त्यावेळी १५८ चेंडूत २०९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने १३ नोव्हेंबर २०१४ ला श्रीलंकाविरुद्ध १७३ चेंडूत २६४ धावांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांची खेळी केली. हे त्याचे दुसरे द्विशतक होते.

त्यानंतर ३ वर्षाने त्याने १३ डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेविरुद्धच नाबाद २०८ धावांची खेळी करत तिसरे द्विशतक केले. त्याच्या या वनडेती ३ द्विशतकांचा विक्रम मोडणे सध्यातरी कोणत्याही क्रिकेटपटूसाठी कठीण आहे.

२. वनडेतील २६४ धावांची सर्वोच्च खेळी – 

वनडेमध्ये रोहितने पहिल्या द्विशतक झळकावल्यानंतर १ वर्षाने १३ नोव्हेंबर २०१४ ला दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना केले. त्यावेळी त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती.वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती.

रोहितने २६४ धावांपैकी तब्बल १८६ धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या. रोहितचा हा विक्रम देखील मोडणे अवघड आहे. कारण आत्तापर्यंत रोहित व्यतिरिक्त वनडेत द्विशतक करणाऱ्या खेळाडूंंनाही २४० धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

३. एका विश्वचषकात ५ शतके – 

इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकात रोहितने एक-दोन नव्हे तब्बल ५ शतके केली होती. याआधी कोणत्याच क्रिकेटपटूला एका विश्वचषकात ५ शतके करता आली नव्हती. रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध शतके केली होती. तसेच ५ शतकांसह त्या विश्वचषकात सर्वाधिक ६४८ धावा केल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी – 

२५ वर्षांनी सौरव गांगुली पुन्हा त्या जागी गेला, केले मोठे दान

३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न

डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---