कोलकाता| भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात ईडन गार्डन स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना (Second T20I) पार पडला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्याने त्यांना हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी होती. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मारलेल्या एका षटकाराची चांगलीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. (Rohit Sharma One Hand Six)
रोहितने मारला खास षटकार
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी या सामन्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. ईशान किशन केवळ दोन धावा काढून माघारी त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. पहिल्या सामन्यात आक्रमक ४० धावांची खेळी करणारा रोहित या सामन्यात काहीसा चाचपडताना दिसला. तो आत्मविश्वासाने फटके खेळताना दिसला नाही. तो १८ चेंडूमध्ये १९ धावा काढून बाद झाला. या छोट्याशा खेळीत त्याने दोन चौकार व एक षटकार ठोकला.
— Bleh (@rishabh2209420) February 18, 2022
रोहितने या खेळीत जो षटकार मारला तो चाहत्यांसाठी अनपेक्षित असा होता. आपल्या उत्कृष्ट टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहितने चक्क एका हाताने चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावला. रोमारियो शेफर्ड याने टाकलेल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित मोठा फटका मारण्यास इच्छुक होता. मात्र, काहीशा हळूवार आलेल्या चेंडूवर रोहित चकला व चेंडूने बॅटची बाहेरची कड घेतली. एका हाताने मारलेला हा चेंडू हवेत उडाल असताना तो झेलबाद होईल असे सर्वांना वाटले. परंतु, चेंडू स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून षटकार गेला.
त्याच्या या षटकारामूळे अनेकांना भारताचा एसटी रक्षक रिषभ पंत याची आठवण झाली. रिषभ अनेकदा अशाप्रकारे एका हाताने षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. रिषभने या सामन्यात नाबाद ५२ धावांची खेळीदेखील केली.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून लाडक्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहायला जात नाही सचिन, कारण आहे कौतुकास्पद (mahasports.in)