भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आत्तापर्यंत ३६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहे. यातील एक विक्रम असा की रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा पार करणारा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे.
त्याने ३६४ सामन्यातील ३७० डावात खेळताना ४२३ षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याआधी ४०० षटकारांचा टप्पा केवळ वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पार केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार(Most Sixes in International Cricket) मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने ४६२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५३० डावात ५३४ षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार पूर्ण करणारा तो सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आफ्रिदी आहे. त्याने ५२४ सामन्यातील ५०८ डावात ४७६ षटकार ठोकले आहेत. त्यानंतर सध्या या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
५३४ – ख्रिस गेल (५३० डाव)
४७६ – शाहिद आफ्रिदी (५०८ डाव)
४२३* – रोहित शर्मा (३७० डाव)
३९८ – ब्रेंडन मॅक्यूलम (४७४ डाव)
३५९ – एमएस धोनी (५२६ डाव)