भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना संक्रमित आढळल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेऊ सकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. कसोटी सामन्याला मुकल्यानंतर आता रोहित शर्माचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) विलगीकरणातून बाहेर पडला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात ७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार असून त्यासाठी रोहित उपलब्ध असणार आहे. रोहित शर्मा कोसटी सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या लिस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यात सहभागी झाला होता. पण कोरोना पॉजिटिव्ह आढळल्यानंतर त्याने सामन्यातून माघार घेतली. कसोटी सामना १ जुलैला सुरू झाला, पण तोपर्यंत रोहित कोरोनातून बरा झाला नव्हता.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाने ३ जुलै रोजी एक सराव सामना खेळला, पण कोरोना निगेटिव्ह असून देखील रोहितला यामध्ये सहभागी होता आले नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, “होय, रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मेडिकल प्रोटोकॉलनुसार आता तो आयसोलेशनमध्ये आहे. तो आज नार्थप्टनशायरविरुद्धच्या टी-२० सराव सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. कारण टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधी आराम आणि सरावाची गरज आहे.”
मेडिकल प्रोटोकॉलनुसार कोरोना विलगीकरणाच्या बाहेर निघाल्यानंतर कोणत्याही खेळाडूच्या फुफुसाची क्षमता तपासण्यासाठी ह्रदयाच्या काही आवश्यक तपारण्या करणे गरजेचे आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी रोहित स्वतः खूप उत्सुक होता. परंतु कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी तीन वेळा त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटिव्ह आला, ज्यामुळे त्याला विलगीकरण कालावधी पूर्ण करणे बंधनकारण होते.
दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या कसोटी सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करून मजबूत पकड बनवली आहे. पहिल्या डावात भारताने ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तर इंग्लंडचा संघ मात्र २८४ धावांवर सर्वाबद झाला. पहिल्या डावात भारताने मोठी आघाडी घेतली असून संघ सामनाही नावावर करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND | एकट्या बेयरस्टोने लडवली इंग्लंडची खिंड, भारतासाठी सिराजची धारदार गोलंदाजी
मिचेल स्टार्कने ठेवला भारतीय खेळाडूंपुढे आदर्श, राष्ट्रीय संघासाठी दिली टी-२० लीगची कुर्बानी
सिराजच्या झटक्याने इंग्लंडची धुळधान, भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी