गेल्या दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते रोहित शर्माच्या यो-यो टेस्टचा निकाल ऐकण्यास उत्सुक होते.
या यो-यो टेस्टच्या निकालाबद्धलची महत्वपूर्ण माहिती खुद्द रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे.
15 जूनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय व टी-20 मालिका खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघाची राष्ट्रीय क्रिकेट आकादमी बेंगलोर येथे यो-यो टेस्ट झाली होती.
या टेस्टवेळी बीसीसीआयच्या परवानगीने रोहित रशिया येथिल विश्वचषक पाहण्यासाठी गेल्यामुळे अनुपस्थित राहीला होता.
Dear… it’s no ones business how & where I spend my time.I’m entitled to have time off as long as I follow protocol.Let’s debate some real news shall we😊 & to a few channels,I had just 1 chance to clear my yo-yo that was today.Verification before reporting is always a good idea
— Rohit Sharma (@ImRo45) June 20, 2018
15 जूनला झालेल्या यो-यो टेस्टमध्ये आयपीयलमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा अंबाती रायडू फेल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.
त्यामुळे रोहीतसह त्याच्या चाहत्यांनी रोहीतच्या यो-यो टेस्ट विषयी चिंता होती.
बुधवार दि. 20 जूनला रोहितने बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत यो-यो टेस्ट दिली. या यो-यो टेस्टमध्ये रोहित पास झाल्याची माहिती त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिली.
https://www.instagram.com/p/BkPeOFOgDkL/?hl=en&taken-by=rohitsharma45
यावर युझवेंद्र चहल आणि केदार जाधव या संघ सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी भारतीय अ संघाचा संजू सॅमसन आणि वरीष्ठ संघातील अंबाती रायडू यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याने त्यांना इंग्लड दौऱ्यातून डच्चू देण्यात आला आहे. तर मोहम्मद शमीला अफगानिस्तान विरूद्धच्या सामन्यातून वगळले होते.
महत्वाच्या बातम्या-
–सचिनने जे भारतासाठी केलं तेच ईऑन माॅर्गनने इंग्लंडसाठी करुन दाखवलं
–२२ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला