आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)आधी भारतीय संघ घरच्या मैदानावर दोन टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिली मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून (20 सप्टेंबर) सुरू होत आहे. तर या मालिकेआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचबरोबर त्याने काही अनुभवही शेयर केले आहेत. यावेळी त्याने भारतीय महिला संघाची अनुभवी मध्यम वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या गोलंदाजीला तो कसा सामोरा गेला हे सांगितले आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सामन्याने सुरूवात होणार असून हा सामना मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. तर याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “झुलन आणि मी एनसीएमध्ये सराव करत होतो. तेव्हा तिने मला इनस्विंग गोलंदाजी केली आणि त्यामुळे मला फलंदाजी करताना त्रास झाला. तिची गोलंदाजी खूपच प्रभावशाली आहे.”
झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने 2002मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. सध्या भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका खेळली जात असून झुलनची ही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका असणार आहे. या मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना लॉर्ड्सवर 24 सप्टेंबरला खेळला जाणार आहे.
झुललने दोन दशके महिला क्रिकेट गाजवले आहे. तिने रविवारी (18 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात तब्बल 42 निर्धाव चेंडू टाकले आहे. तिने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 2च्या इकॉनॉमी रेटने 20 धावा देत 1 विकेट घेतली आहे. यावेळी तिच्या गोलंदाजीवर कोणीही षटकार मारला नाही की चौकार.
झुलनने कारकिर्दीतील पहिला वनडे सामना इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे खेळला होता. त्या सामन्यात 7 षटके गोलंदाजी करताना तिने 15 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. तिच्या जबरदस्त गोलंदाजीने भारत 2005 आणि 2017च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. ती महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स (252*) घेणारी गोलंदाज आहे. या विक्रमासोबतची क्रिकेटच्या कारकिर्दीचा निरोप घेणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरला डावलून रॉयल्सचे नेतृत्व मिलरकडे! ‘त्या’ कामगिरीचे मिळाले बक्षीस
‘क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते’, माजी भारतीय दिग्गजाचा स्ट्रेट ड्राइव्ह
“त्याने स्वतःला सिद्ध केलंय”, या खेळाडूच्या कामगिरीने रोहित झालाय भलताच खुश