---Advertisement---

वनडेतील सर्वोत्तम खेळी तर कसोटी पदार्पणात शतक, ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने केली आहे अशी कामगिरी

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 9:20 AM
rohit-sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (india vs west indies) या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर (eden garden) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. दरम्यान कोलकाताचे मैदान हे रोहित शर्मासाठी नेहमीच खास राहिले आहे.

रोहित शर्माने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. परंतु ईडन गार्डन आणि रोहित शर्माचे एक खास नात राहिले आहे. त्याने कर्णधार म्हणून पहिला सामना ईडन गार्डन्सवर खेळला होता. याच मैदानावर त्याला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.

तसेच रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला तब्बल ५ वेळेस जेतेपद मिळवून दिलेे आहे. या ५ पैकी २ अंतिम सामने (२०१३ आणि २०१५) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडले होते. या दोन्ही अंतिम सामन्यात रोहित शर्माने बाजी मारली होती.

रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५६११ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एकमेव शतक झळकावले आहे. हे एकमेव शतक देखील त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झळकावले होते.

वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले होते. हे शतक देखील त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झळकावले होते. तसेच वनडे क्रिकेटमधील २६४ धावांची विक्रमी खेळी देखील त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर केली होती. त्याने २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २६४ धावांची खेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी

ईडन गार्डन्सवर पाऊल ठेवताच रोहितच्या नावे ‘खास’ विक्रमाची नोंद

पाय डगमगले आणि फुकटात षटकार दिला; पण बिश्नोई पुढे असा जबरदस्त खेळला की, मोठी चूकही किरकोळ वाटेल!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---