एक क्रिकेटपटू मैदानावर असताना सर्व गोष्टी विसरुन संघाला विजयपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असतो. बऱ्याचदा दुखापती झाल्यानंतरही खेळाडूंनी त्यावर दुर्लक्ष करत चिवट झुंज दिल्याचे आपण पाहिले आहे. डोक्याला चेंडू लागल्याने रक्कस्त्राव होऊनही पट्टी बांधून गोलंदाजी करणारे अनिल कुंबळे आजही सर्वांना आठवतात. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशीही असाच काहीसा प्रकार घडला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला जखमा झाल्या असूनही त्याने संघासाठी शतकी खेळी केली.
कितीतरी तास चाललेली ही खेळी संपेपर्यंत त्याने आपल्याला होत असलेल्या वेदनांची जाणीवही होऊ दिली नाही. अखेर इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान बीसीसीआयने त्याच्या दुखापतीची माहिती दिल्यानंतर सर्वांना यासंदर्भात कळाले. यानंतर आता त्याच्या वेदनांची जाणीव करुन देणारे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
इंग्लंडच्या नाममात्र ९९ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना रोहित आणि केएल राहुल यांनी सलामीला ८३ धावांची मजबूत भागिदारी केली होती. ३४ व्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारासोबत मिळून रोहितने जवळजवळ दीडशतकी भागिदारी रचली. तब्बल २५६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने त्याने १२७ धावा फटकावल्या. या झुंजार खेळीदरम्यान त्याला इंग्लंडच्या धाकड गोलंदाजांच्या माऱ्याला सहन करावे लागले. यावेळी त्याच्या पायाच्या मांडीवर जखमा झाल्या होत्या. तरीही रोहितने त्या वेदनांना विसरुन फलंदाजी केली.
काही चाहत्यांनी त्याच्या मांडीवर झालेल्या या जखमांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ‘एक खरा क्रिकेटप्रेमीच त्याच्या वेदना जाणवू शकतो,’ अशा शब्दात एका चाहत्याने पोस्ट शेअर केली आहे. सोबतच त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
याबरोबरच बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रोहितला डाव्या गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे तो इंग्लंडच्या दुसऱ्या डावावेळी क्षेत्ररक्षणासाठी आला होता. त्याच्याबरोबर पुजाराच्या डाव्या पायाच्या घोट्यामध्ये वेदना होत असल्याने तोही क्षेत्ररक्षणास आला नव्हता. त्यांच्यावर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
https://www.instagram.com/p/CTbbLizpSoC/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CTci3W7lZm0/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यातील शतक रोहितसाठी विक्रमी ठरले. २०१३ मध्ये कसोटी कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर हे त्याचे परदेशातील पहिलेच शतक आहे. या शतकासह तो मोठमोठ्या विक्रमांत दिग्गज क्रिकेटपटूंनाही वरचढ ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथी कसोटी जिंकण्याच्या मार्गावर असलेली ‘विराटसेना’ काळजीत, रोहित-पुजाराच्या दुखापतीवर आली अपडेट
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही