ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिका विजयात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने महत्त्वाची भुमिका पार पाडली. या मालिकेनंतर त्याला भारतीय फलंदाज रोहित शर्माने बेबीसिटींग करायला ये असे हास्यास्पद ट्विट केले आहे.
‘रिषभ मी ऐकले आहे की तू एक चांगला बेबीसिटर आहे. मला पण सध्या एक बेबीसिटर हवा आहे. तुझ्या येण्याने रितिका पण खुश होईल’, असे ट्विट रोहितने केले आहे.
Morning buddy. Heard your a good baby sitter, need one right now. Ritika will be quite happy 😃 @RishabPant777 https://t.co/JkGWTYpnBk
— Rohit Sharma (@ImRo45) January 9, 2019
रोहित मुलगी झाल्याचे कळाल्यानंतर 30 डिसेंबरला त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्यासाठी पुन्हा भारतात परतला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते.
रोहितच्या आधी ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने पंतला बेबीसिटींग करण्यास बोलावले होते. झाले असे की, मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पेन आणि पंत यांच्यात शाब्दीक चकमक झाली होती.
मेलबर्न कसोटीदरम्यान पंत आणि पेनमध्ये काय झाला होता संवाद-
पंत आणि पेन यांच्यातील संवाद स्टंप माईकमधून ऐकू आला होता. पहिल्यांदा पेन पंतला स्लेज करताना म्हणाला होता की ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’
‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तूला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’
पण हे स्लेजिंग फक्त सामन्यापुरतेच मर्यादीत होते, हे सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले होते. पंतने पेनच्या मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर फोटो काढला होता.. हा फोटो पेनची पत्नी बोनी पेनने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या स्टोरीला तिने ‘बेस्ट बेबीसिटर’ असे कॅप्शन दिले होते.
Tim Paine to @RishabPant777 at Boxing Day Test: "You babysit? I'll take the wife to the movies one night, you'll look after the kids?"
*Challenge accepted!* 👶
(📸 Mrs Bonnie Paine) pic.twitter.com/QkMg4DCyDT
— ICC (@ICC) January 1, 2019
या मालिकेत पंतने 350 धावा करताना यष्टीमागे 20 झेलही घेतले आहेत. सिडनी कसोटीमधील नाबाद 159 धावा या त्याच्या मालिकेतील सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.
कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका होणार असल्याने पुन्हा रोहित ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कॉफी विथ करन हार्दिक पंड्या, केएल राहुलला पडले महागात…
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
–विश्वचषक विजेता शुबमन गिल स्टार आहे, लवकरच येणार टीम इंडियात