भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकाच्या तयारीसाठी सध्या बेंगलोर नजीकच्या अलूर येथे सराव करतोय. स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे हे चार दिवसीय सराव शिबिर आयोजित केले आहे. आशिया चषकासाठी निवड झालेले सर्व अठरा खेळाडू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील खेळाडू या ठिकाणी दिसून येतात. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आशिया चषक व त्यानंतर होणाऱ्या वनडे विश्वचषक या स्पर्धांसाठी खास तयारी करत असल्याचे दिसत आहे.
अलूर येथे सुरू असलेल्या या सराव शिबिरात रोहित शर्मा पहिल्या दोन दिवशी वेगवान गोलंदाजांविरुद्ध सराव करताना दिसला. दुसऱ्या दिवशी त्याने खास करून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला. त्याने राजस्थानचा अनुभवी वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी याच्याविरूद्ध खास तयारी केली. अनिकेत याला भारतातील सर्वोत्तम डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाते.
रोहितच्या या तयारीविषयी बोलताना भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले,
“रोहित याला डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध अडचणींचा सामना करावा लागला आहे. असे गोलंदाज ज्या कोनांमधून गोलंदाजी करतात त्यांच्याविरुद्ध कोणत्या ठिकाणी धावा करायच्या याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळेच रोहितने हा मार्ग अवलंबल्याचे दिसते.”
आगामी आशिया चषकात रोहितला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्याविरूद्ध सावध राहावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या विश्वचषकात आफ्रिदीसह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तसेच अफगाणिस्तानचा फजल हक्क आरोपी यांच्याविरुद्ध जपून फलंदाजी करावी लागणार आहे.
(Rohit Sharma Practice Against Left Arm Pacers In Training Camp)
महत्वाच्या बातम्या-
‘तिलक वर्माला विश्वचषकात संधी देऊ नका…,’ युवा फलंदाजाविषयी काय हे म्हणाला विश्वचषकविजेता दिग्गज
वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात होणार धाकड ‘यंगस्टर’ची एन्ट्री! कर्णधार बटलरने दिले संकेत