आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी भारतात सुरू होणार आहे. तिलक वर्मा वनडे विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असेल, अशा बातम्या सतत येत आहेत. त्याआधी त्याला आशिया चषक 2023साठीही संघात घेतले गेले आहे. मात्र, आशिया चषकात त्याला संधी मिळेण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, वनडे विश्वचषकासाठी त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. अशातच भारतीय संघाचे माजी दिग्गज के श्रीकांत यांनी तिलक वर्माला वनडे विश्वचषकात खेळवण्याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाचे मध्यक्रमातील फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषक संघातून पुनरागमन करत आहेत. या दोघांच्या पुनरागमनामुळे तिलक वर्माला आशिया चषकात संधी मिळण्याची शक्यता दिसत नाहीये. अशात विश्वचषकात तो वनडे पदार्पण करण्याची शक्यात आहे. पण के श्रीकांत यांच्या मते संघ व्यवस्थापनाने थेट वनडे विश्वचषकात तिलकला संधी देणे योग्य नसेल. त्याआधी त्याला एखादी मालिका खेळवली पाहिजे.
भारताला 1983 साली विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघात के श्रीकांत यांचाही समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून त्यांचा अनुभव मोठा आहेच. पण भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्यांची भूमिकाही त्यांनी दीर्घकाळ पार पाडली आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर श्रीकांत म्हणाले की, “तिलक वर्माला मोठ्या स्पर्धेत पदार्पणाची संधी दिली नाही पाहिजे. त्याआधी त्याला वनडे मालिकेतल संधी दिली पाहिजे. तो एक विश्वासू खेळाडू आङे. आशिया चषक त्याच्यासाठी चांगली संधी आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपण त्याचे प्रदर्शन आणि गुणवत्ता पाहिली आहे.”
भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023 आधी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. के श्रीकांत यांच्या मते संघ व्यवस्थापनाने तिलक वर्मा याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत वनडे पदार्पणाची संधी दिली पाहिजे. जेणेकरून आगामी वनडे विश्वचषकात त्याला अडचण येणार नाही. “तिलकमध्ये जबरदस्त क्षमता आहे. तो एक अप्रतिम खेळाडू आहे. पण विश्चषकासाठी संघात घेण्याआधी त्याला वनडे मालिका खेळली पाहिजे. आपण त्याला चांगल्या पद्धतीने तयार केले पाहिजे,” असे श्रीकांत पुढे म्हणाले. (K Srikanth feels Tilak Verma should be given ODI debut before World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात होणार धाकड ‘यंगस्टर’ची एन्ट्री! कर्णधार बटलरने दिले संकेत
विश्वचषक तोंडावर आला असताना गांगुलीच्या वक्तव्याने खळबळ! म्हणतोय, ‘…वर्ल्डकप जिंकू शकत नाही’