---Advertisement---

श्रीलंकन संघाला कोरोनाचे ग्रहण! आशिया चषक तोंडावर असताना चार खेळाडूंना कोरोनाची लागण

Sri lanka Team
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होण्यास फारसा वेळ राहीला नाही. पाकिस्तानशिवाय आगामी स्पर्धेचे सामने श्रीलंकेतही खेळवले जाणार आहेत. यामध्ये 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना 30 ऑगस्टला होणार आहे. तर, श्रीलंकेचा संघ 31 ऑगस्ट रोजी पल्लेकेलेच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यादरम्यान, श्रीलंकेच्या संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

श्रीलंकेचा संघ सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेच्या तयारीत गुंतला आहे. माध्यमातील वृत्तपत्रांनुसार वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) आणि वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांच्यासह श्रीलंकेच्या संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत आता या खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्याच्या 15 दिवस आधी खेळणे कठीण झाले आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत संघ निवडणे निवडकर्त्यांसाठी सोपे काम होणार नाही. लंका प्रीमियर स्पर्धेत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमेरा खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

श्रीलंका यावेळी आशिया चषक स्पर्धेत ब गटात आहे. यात त्यांना बांगलादेश आणि अफगानिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन विजय मिळवल्यानंतर श्रीलंका संघ सुपर 4 टप्प्यात पोहचू शकेल. श्रीलंका संघाचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा लंका प्रीमियर दरम्यान जखमी झाला होतो. यामुळे तो अशिया चषकाच सुरवातीचे दोन सामने खेळणार नसल्याचे समोर आले होते. आता या कोरोनाच्या बातमीने श्रीलंका क्रिकेट संघाची चिंता वाढली आहे. सोबतच जागतिक क्रिकेट प्रेमी देखिल चिंता व्यक्त करत आहेत.

भारत पाकिस्तान सामना रंगणार या दिवशी
भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. याच पार्शवभूमीवर दोन्ही संघानी आपला संभाव्य संघ जाहिर  केला आहे. श्रेयस आय्यर आणि केएल राहुलच्या पुनरागमनामुळे  भारताय संघाचा मधल्या फळितील प्रश्न सुटला आहे. (sri lanka team 4 players is corona positive before asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या- 
‘तिलक वर्माला विश्वचषकात संधी देऊ नका…,’ युवा फलंदाजाविषयी काय हे म्हणाला विश्वचषकविजेता दिग्गज
वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात होणार धाकड ‘यंगस्टर’ची एन्ट्री! कर्णधार बटलरने दिले संकेत 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---