टी20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाने काल (4 जुलै) संध्याकाळी चाहत्यांसोबत जल्लोष साजरा केला. मरिन ड्राईव्हवर संघाची विजयी परेड पाहायला मिळाली आणि वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात चाहत्यांनीही खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचा धनादेशही संघाला सुपूर्द केला. या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्यानी टाकलेल्या अंतिम षटकाची स्तुती केला तेव्हा स्टँडवर बसलेल्या चाहत्यांनी ‘हार्दिक-हार्दिक’ असा जयघोष सुरू केला. हार्दिक पांड्या कालची (4 जुलै) संध्याकाळ क्वचितच विसरेल.
जेव्हा आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 पूर्वी कर्णधार बनवले तेव्हा चाहत्यांना फारसे प्रभावित झाले नाही. यामुळे हार्दिकला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. इतकंच नाही तर आयपीएलदरम्यानच्या मॅचेसमध्ये त्याला बोइंगचाही सामना करावा लागला होता. इतकेच काय, मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीसाठी लोकांनी हार्दिक पांड्याला पूर्णपणे जबाबदार धरले. पण आता सर्व काही बदलले आहे. काल संध्याकाळी ज्या वानखेडे स्टेडियममध्ये हार्दिकला धिंगाणा सहन करावा लागला, त्याच वानखेडे स्टेडियममध्ये चाहते हार्दिक-हार्दिकच्या घोषणा देत होते. ते दृश्य पाहण्यासारखे होते.
Goosebumps 🔥
Mumbai crowd chanting
“HARDIK… HARDIK…” 🥶#VictoryParade #HardikPandya#IndianCricketTeam #Wankade pic.twitter.com/qELzvruV5G— Bala Jith (@ThalaBalajith) July 4, 2024
टी20 विश्वचषकाच्या अंतिम षटकाची कथा सांगताना रोहित शर्मा म्हणाला, ‘हार्दिक ते मोठे षटक टाकत होता. हॅट्स ऑफ त्यानं ते ओव्हर केलं. किती धावा आवश्यक आहेत हे महत्त्वाचे नाही. शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना खूप दडपण असते. रोहित शर्माने हे सांगताच संपूर्ण वानखेडे हार्दिक-हार्दिकच्या घोषणांनी दुमदुमले. चाहत्यांची ही कृती हार्दिकसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. हार्दिकने स्वतः उभे राहून चाहत्यांचे आभार मानले.
महत्तवाच्या बातम्या-
घरी देखील हिटमॅनचं जंगी स्वागत, या पध्दतीनं होती खास व्यवस्था
विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठमोळ्या भाषेत प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाच्या विमानाला पाण्याचा वर्षाव! पाहा वॉटर सॅल्यूट असतं तरी काय?