भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर हात घातला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची रणनीती काय असेल? याचा उलगडा त्याने केला आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर मालिकेचा सराव म्हणून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे पाहत नाहीये. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा बरेच काही पणाला लागते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे या कसोटी मालिकेची सुरुवात आमच्यासाठी शानदारच व्हायला हवी.
पुढे बांगलादेशच्या आव्हानाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, सर्व संघांना भारतीय संघाला हरवण्यात मजा येते. त्यांना मजा घेऊ द्या. जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला होता, तेव्हा तेदेखील पत्रकार परिषदेत खूप काही बोलले होते. पण आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर लक्ष दिले नव्हते. आम्ही फक्त चांगले क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील असतो.
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत जयस्वाल रचणार इतिहास! विराटही आजपर्यंत करू शकला नाही हा पराक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना