भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका भारतात आयोजित केली जातेय. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. तर, दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांच्याकडे मोठे विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
जयस्वाल याच्याकडे बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यात केवळ 132 धावा करून मोठा कारनामा करण्याची संधी असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एका सायकलमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी तो करू शकतो. त्याने आत्तापर्यंत 2023 ते 2025 या सायकलमध्ये 1028 धावा बनवल्या आहेत. त्याने आणखी 132 धावा बनवल्यास तो अजिंक्य रहाणे याचा 1159 धावांचा विक्रम मोडीत काढू शकतो. रहाणे याने 2019 ते 2021 या सायकलमध्ये ही कामगिरी केली होती. जयस्वाल हा रहाणे व रोहित शर्मा यांच्यानंतर एका डब्ल्यूटीसी सायकलमध्ये 1000 धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. विराट कोहली याला अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही.
जयस्वाल सध्या 2023 ते 2025 या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या जो रूट याच्यापुढे जाण्यासाठी त्याला या मालिकेत आणखी 371 धावा कराव्या लागतील. जयस्वाल याचा सध्याचा फॉर्म तितका चांगला नसल्याने, भारतीय संघाची देखील चिंता वाढली आहे.
पहिल्या सामन्यासाठी यातून निवडणार संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना
युरोपियन मुलींमध्ये नीरज चोप्राची ‘क्रेझ’, सेल्फीसोबत नंबर मागितला! VIDEO