भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात पूर्णवेळ भारताच्या संघाचे कर्णधारपद सांभाळल्यापासून दमदार कामगिरी केली आहे. आता कर्णधारपदाच्या काळाचा रोहित आनंद घेत असतानाच त्याने एक नवी कोरी गाडीही खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोटींमध्ये आहे. त्याच्या या गाडीची सध्या मोठी चर्चा होत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार रोहितने लँबॉर्गिनी उर्स (Lamborghini Urus) ही गाडी विकत घतली आहे. त्याच्या या गाडीचा रंग भारताच्या जर्सीप्रमाणेच निळा आहे. भारतातील लग्झरी कारमध्ये गणली जाणाऱ्या गाड्यांमध्ये लँबॉर्गिनी उर्सचे नाव अव्वल नावांमध्येच येते. खूप कमी भारतीय लोकांकडे ही कार आहे. रोहितलाही गाड्यांची आवड आहे आणि आता त्याने ३.१० कोटी रुपये मोजत लँबॉर्गिनी उर्स ही कार विकत घेतली आहे.
रोहितने त्याच्या या नव्या कारमध्ये काही वैक्तिगत सुविधाही करून घेतल्या आहेत. त्याच स्पोर्टिवो लेदर इंटिरियर, २२ इंचाची डायमंड रिम्स कट यांचा समावेश आहे. तसेच त्याने आपल्या आवडीने गाडीचे इंटेरियरही करून घेतले आहे, ज्यात रेड-ब्लॅक केबिन सामील आहे. तसेच गाडीचा डॅशबोर्डही काळ्या आणि लाल रंगात करून घेतला आहे (Rohit Sharma purchases Lamborghini Urus worth INR 3.10 crore).
Rohit Sharma recently bought @Lamborghini Urus painted with Blu Eleos team India color👍🏽👍🏽. @ImRo45 #RohitSharma pic.twitter.com/TvgUbb2wuc
— Rohit Sharma Trends™ (@TrendsRohit) March 1, 2022
Rohit Sharma buys brand new Lamborghini Urus worth INR 3.10 Crores. @coolfunnytshirt pic.twitter.com/dKC8BDdYFW
— जयहिंद (@AshwiniAkm) March 1, 2022
रोहित करतोय तिन्ही प्रकारात नेतृत्त्व
गेल्यावर्षी विराट कोहली भारताच्या टी२० आणि वनडे संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. त्यामुळे ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली होती. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीला विराटने कसोटी संघाचेही नेतृत्त्व सोडल्याने रोहित भारताच्या कसोटी संघाचाही कर्णधार झाला. विशेष म्हणजे भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून रोहितने पराभव स्विकारलेला नाही.
तसेच आता रोहित ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. रोहितची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे.
ट्वीट्समुळे आला चर्चेत
मंगळवारी रोहित केवळ त्याच्या गाडीमुळेच नाही, तर काही वेगळ्या ट्वीट्सवरूनही चर्चेत आला होता. त्याच्या या ट्वीटवरून त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा कयास चाहत्यांनी लावला होता. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर मंगळावारी पहिले ट्वीट करण्यात आले की, ‘मला नाणेफेक करायला आवडते, विशेषत: जेव्हा नाणे माझ्या पोटात जाते.’ तसेच रोहितने दुसरे ट्वीट केले की, ‘तुम्हाला माहित आहे का की मधमाशी एक उत्तम बॉक्सिंग बॅगचे काम करते.’ याशिवाय आणखी एक ट्वीट करण्यात आले, ज्यात लिहिले होते की, ‘क्रिकेटचे चेंडू खाण्यालायक असतात, खरंय ना?’
रोहितच्या या ट्वीटवर केवळ चाहत्यांनीच नाही, तर भारतीय संघातील रोहितचे संघसहकारी युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांनीही प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या –
तेजतर्रार राशिद! स्टार्क-ब्रेट लीला मागे सोडत ‘त्या’ विक्रमावर सांगितला हक्क