---Advertisement---

अहमदाबादच्या मैदानावर ‘या’ 3 भारतीय दिग्गजांनी वनडेत केल्या सर्वाधिक धावा

On: मंगळवार, फेब्रुवारी 11, 2025 5:07 PM
virat kohli and rohit sharma
---Advertisement---

(भारत विरूद्ध इंग्लंड) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता दोन्ही संघातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा वनडे सामना उद्या (12 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण हे जाणून घेऊया की, या मैदानावर कोणत्या 3 भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

1) रोहित शर्मा- अहमदाबादमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने केल्या आहेत. रोहितची बॅट या मैदानावर खूप चालते. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितने शेवटच्या वनडे सामन्यात इंग्लंडविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे. आता शतक ठोकल्यानंतर तो या मैदानावर येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याच्याकडून अजून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. रोहितने नरेंद्र मोदी स्टेडियमवर 7 डावात 50.57च्या सरासरीने 357 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत.

2) राहुल द्रविड- माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडनेही अहमदाबादच्या मैदानावर खूप चांगली फलंदाजी केली आहे. तो येथे भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 5 डावात 114च्या प्रभावी सरासरीने 314 धावा केल्या आहेत, दरम्यान तो दोनदा नाबाद राहिला आहे. यावेळी द्रविडने 2 शतकांसह 1 अर्धशतक झळकावले.

3) विराट कोहली- या यादीत विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने अहमदाबादमधील त्याच्या शेवटच्या वनडे सामन्यात अर्धशतक झळकावले होते पण यावेळी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मैदानावर विराटने 27.33च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

माजी क्रिकेटपटूची गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
भारत-इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर
Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---