भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना काल (06 फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाड मिळवली आहे. दरम्यान या सामन्यांनतर बोलताना कर्णधार रोहित शर्माने संघाचे काैतुक केले.
सामना संपल्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी काही विशेष साध्य करण्याचा प्रयत्न करू इच्छित नाही. परंतु इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याप्रमाणे शक्य तितके योग्य ते करू इच्छितो. 249 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताची अवस्था 3 बाद 221 वरून 6 बाद 235 अशी झाली. एक छोटीशी अडचण वगळता भारताने जवळजवळ उत्तम कामगिरी केली. पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकल्यानंतर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पुढे रोहित म्हणाला, “काही खास नाही. एक संघ म्हणून, मला फक्त एवढेच हवे आहे की आपण शक्य तितके योग्य गोष्टी करत आहोत याची खात्री करत राहावे. आपण साध्य करण्याचा प्रयत्न करू इच्छितो असे काहीही विशिष्ट नाही. आम्हाला गोलंदाजी, फलंदाजी आणि अशाच बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न करायचे आहेत. आज आम्ही यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो, पण मला वाटते की शेवटी काही विकेट्स गमावायला नको होत्या.”
रोहितने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलच्या खेळीचे कौतुक केले. अक्षरने ज्या पद्धतीने खेळला आणि आपल्या योगदानाने टीमला दबावातून बाहेर काढले, त्यावर रोहित खूपच समाधानी होता.
रोहितने पुढे सांगितले की, इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी डाव्या हाताच्या फलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळे त्याचे प्रमोशन झाले. अक्षरने देखील ते योग्य ठरवत. चमकदार खेळी खेळली. गिल आणि अक्षरच्या शानदार भागीदारीमुळे भारताने सामना सहज जिंकला.
हेही वाचा-
“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!
नागपूरचा वनडे सामना भारताच्या नावे, इंग्लंडचा दारुण पराभव, गिल-अय्यरची निर्णायक खेळी
IND vs ENG; श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतकी खेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी






