भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आगामी वनडे विश्वचषकापूर्वी 22 सप्टेंबरपासून वनडे मालिका खेळणार आहे. तीनसामन्यांची ही वनडे मालिका भारताला आपल्या मायदेशात खेळायची आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी या वनडे मालिकेसाठी संघ घोषित केला, ज्यामध्ये रविचंद्रन अश्विन पुनरागमन करणार हे निश्चित झाले. कर्णधार रोहितने अश्विनच्या पुनरागमनाविषयी खास प्रतिक्रिया दिली.
रविचंद्रन अश्विन मागच्या जवळपास 20 महिन्यांपासून एकही वनडे सामना खेळला नाहीये. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन दरम्यानच्या काळात अप्रतिम राहिले आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत निवडण्यासाठी रोहितने स्वतः पुढाकार घेतल्याचे दिसते. पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ दाखवत आला आहे. त्याच्याकडे भरपूर अनुभव देखील आहे. फक्त काहीच खेळाडू असे असतात, जे अश्विनप्रमाणे मनात असतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याची गुणवत्ता समजेल.” (Rohit Sharma reacts to Ravichandran Ashwin’s return to ODI cricket)
Coming ???? next ???? #INDvAUS
Here are the #TeamIndia squads for the IDFC First Bank three-match ODI series against Australia ???? pic.twitter.com/Jl7bLEz2tK
— BCCI (@BCCI) September 18, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज