---Advertisement---

व्हिडिओ: १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या रोहित शर्माने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

On: गुरूवार, नोव्हेंबर 7, 2019 9:14 PM
---Advertisement---

राजकोट। आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh)  संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) होत आहे.

2007 च्या टी20 विश्वचषकातील इंग्लड विरूद्धच्या सामन्यातून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा आज 100 वा आंतरराष्ट्रीय टी20सामना खेळत आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक टी20 सामने खेळणारा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा पराक्रम पाकिस्तानचा शोएब मलिकने केला आहे. त्याने 111 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

त्यामुळे रोहितसाठी आजचा सामना खास ठरला आहे. या खास सामन्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला भारतासाठी 100 सामने खेळने अभिमानाची गोष्ट आहे.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कधीही विचार केला नव्हता की मला इतके सामने खेळायला मिळतील.मला भूतकाळात मिळालेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. मी पदार्पण केल्यापासून हा लांबचा प्रवास होता. यामध्ये अनेक चढ-उतार आले. मी मला आलेल्या अनुभवातून माझा खेळ समजू शकलो. मी जिथे आता उभा आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. भारतासाठी 100 वा टी20 चा सामना खेळणे ही अभिमानाची बाब आहे.’,असे रोहितने म्हटले आहे.

रोहित शर्मा टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 शतके ठोकणारा फलंदाज आहे. त्याला यातील त्याची कोणती खेळी सर्वाधिक आवडते असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘मी माझा डावाची रेटिंग करू शकत नाही. कारण सर्व 4 शतके महत्वाची होती. पहिले शतक हे पहिलेच असते त्यामुळे ते महत्वाचे होते, जरी आम्ही तो सामना पराभूत झालो असलो तरी. अन्य तीन शतके केली ते तिन्ही सामने आम्ही जिंकलो त्यामुळे ती तिन्ही शतके महत्वाची आहेत. मला माझ्या सगळ्या खेळी आवडतात.’

त्याचबरोबर रोहितने त्याच्या सर्व चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

https://twitter.com/Maha_Sports/status/1192441895089139713

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---