भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या बराच चर्चेत आहे. नुकतेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम व ट्विटर अकाउंटवरील बायोमधील ‘इंडियन क्रिकेटर’ (INDIAN CRICKETER) असं लिहिलेला टॅग काढून टाकला आहे. त्यामुळे आता अनेकांना त्याने असे का केले, असा प्रश्न पडला आहे.
त्यातच सोमवारी(26 ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. मात्र, रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेच रोहितने नाराज होत इंस्टाग्राम आणि ट्विटर बायो बदलल्याचा कयास काही चाहत्यांनी लावला आहे.
Is There Any Rift B/w @ImRo45 & @BCCI ??
Why Rohit Removed Indian Cricketer Tag From Twitter & Insta Bio ??
Is He Dropped From The Australian Tour Due To Poor Form or Truly An Injury Concern ?? pic.twitter.com/kLDKCaD8hV
— மாதவன் || 🇮🇳INDIAN🇮🇳 (@maddymadhavan21) October 27, 2020
https://twitter.com/Sivaramnaidu047/status/1320990420688535552
https://twitter.com/rakesh67839026/status/1321007537504673792
https://twitter.com/MI_TN_FC/status/1320975622643089408
रोहितला 18 ऑक्टोबरला आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सच्या पुढील 2 सामन्यातही खेळला नाही.
यानंतर सोमवारी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर ‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्मा आणि इशांत शर्माच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे’, असा ट्विट केला. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पण याचवेळी सोमवारी रात्री मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर रोहित नेटमध्ये सराव करत असल्याचे फोटो टाकले आहेत. त्यामुळे आता नक्की रोहितच्या दुखापतीचा अहवाल काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच आता रोहितने त्याच्या बायोमध्ये बदल केल्याने त्याचे आणि बीसीसीआयबरोबर काहीतरी बिनसले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Just what we love to see! Hitman in action at today’s training 😍#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
Indian selectors don’t name @ImRo45 in any of the 3 formats for a tour ending mid January (the release says @BCCI medical team will monitor his progress). And the same evening @mipaltan upload pictures of him practising. What’s the catch here?
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) October 26, 2020
Is There Any Rift B/w @ImRo45 & @BCCI ??
Why Rohit Removed Indian Cricketer Tag From Twitter & Insta Bio ??
Is He Dropped From The Australian Tour Due To Poor Form or Truly An Injury Concern ?? pic.twitter.com/kLDKCaD8hV
— மாதவன் || 🇮🇳INDIAN🇮🇳 (@maddymadhavan21) October 27, 2020
रोहित सध्या मुंबई इंडियन्स संघासह युएईमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा
भुवी, इशांतची दुखापत पडली पथ्यावर, पहिल्यांदाच मिळाले कसोटी संघात स्थान
टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा
ट्रेडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण