स्पॅनिश लीग ला लीगातील (La Liga) रियल माद्रिदने (Real Madrid) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतातील आपले पहिला ब्रँड अँबेसेडर (First Brand Ambassador In India) म्हणून घोषित केले.
ला लीगा इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर जोस अँटोनियो कचजा (Jose Antonio Kachja) यांनी जाहीर केले की रोहित शर्मा लीगचा पहिला नॉन-फुटबॉलपटू ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.
रोहितसाठी वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी हे वर्ष उत्कृष्ट गेले आहे. रोहित म्हणाला की, ला लीगाने त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यास सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला.
“मी मोठे होत असताना बरेच फुटबॉलचे सामने पाहिले आहेत. हा क्रिकेटपेक्षा नेहमीच चांगला ब्रेक होता,” असे रोहित म्हणाला. रोहित शर्माने एमएस धोनीला भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा दर्जा दिला.
“मला वाटते की एमएस धोनी (MS Dhoni) हा आमच्या संघातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू आहे,” असेही रोहित यावेळी म्हणाला.
“श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), केएल राहुल (KL Rahul), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या तरूण खेळाडूंना फुटबॉलची आवड आहेत. ते फुटबॉलपटूंची हेअरस्टाईलदेखील ठेवतात,” असे रोहित म्हणाला.
रोहितला त्याच्या आवडत्या फुटबॉल आणि क्लबबद्दल विचारले असता, त्याने झिदान (Zidane) आणि रियल माद्रिद यांचे नाव घेतले. माद्रिदने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी अशी रोहितची इच्छा आहे. तसेच, फिफा वर्ल्ड कपमधील त्याचा आवडता संघ स्पेन आहे.
तो म्हणाला, “मी या ला लीगाशी जोडलेलो आहे म्हणून मला हे खेळाडू आवडतात असे नाही. झिनाडेन झिदानचा खेळ मला आवडतो. त्याला फुटबाॅल खेळताना पाहूनच मला फुटबॉलची आवड झाली. मी स्पेनच्या कौशल्यांचे कौतुक करतो,” असेही रोहित म्हणाला.
ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त होणार्या ला लीगाच्या इतिहासातील तो पहिला भारतीय आहे.
अफगाणिस्तानच्या नेतृत्वात पुन्हा बदल; आता राशिद खान ऐवजी हा खेळाडू असणार कॅप्टन
वाचा- 👉https://t.co/GcUE87RoZL👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT @MarathiBrain— Maha Sports (@Maha_Sports) December 13, 2019
रिकी पॉटिंगचे झाले सोशल मीडियावर पदार्पण, शेअर केले हे खास फोटो
वाचा- 👉https://t.co/MyGb7lOSVu👈#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT @MarathiBrain— Maha Sports (@Maha_Sports) December 13, 2019