आपल्या सर्वांना माहित आहे की, सध्या क्रिकेटपटू एकमेकांशी लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधत आहे. अशाच प्रकारे भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी क्रिकेट तसेच अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये आयपीएलचाही समावेश होता.
वॉर्नरने (David Warner) यावेळी मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानाबद्दल म्हणजेच वानखेडे स्टेडिअमबद्दल रोहितला प्रश्न विचारला. तो म्हणाला की, “वानखेडेमध्ये नाणेफेक जिंकणे किती महत्त्वाचे असते?”
यावर रोहित उत्तर देत म्हटले की, “वानखेडे स्टेडिअममध्ये (Wankhede Stadium) नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर मी नाणेफेकमध्ये पराभूत झालो तर संघातील खेळाडू काही वेळासाठी माझ्याकडे पाहत नाही आणि बोलतही नाही. त्यावेळी मला असे वाटते की, मी खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे सर्वांना माहित आहे की, नाणेफेक जिंकणे किती महत्त्वाचे आहे.”
रोहित पुढे म्हणाला की, “मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) वानखेडेमध्ये अनेक नाणेफेक गमावूनही सामने जिंकले आहेत. मुंबईने सर्वाधिक सामने प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. याचं संपूर्ण श्रेय प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना जाते. जर योजना व्यवस्थित बनवली आहे आणि आम्ही पराभूत झालो असेल, तेव्हा वाईट वाटत नाही. वानखेडेमध्ये जर तुम्ही सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा फलंदाज तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. वानखेडेमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये बरोबरीची स्पर्धा असते.”
वॉर्नरने पुढे रोहितला त्याच्या आयपीएलमधील (IPL) हॅट्रिकबद्दलही विचारले. यावर रोहित प्रत्युत्तर देत म्हणाला की, ‘मला विश्वास बसत नाही की, मी आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे.’
रोहितने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहिलेला खेळाडू रिकी पाँटिंगचीही (Ricky Ponting) प्रशंसा केली. तो म्हणाला की, “पाँटिंगची खास गोष्ट म्हणजे तो केवळ युवा खेळाडूंशीच चर्चा करतो. तो अनुभवी खेळाडूंची जास्त काळजी करत नाही. त्याचे उद्दिष्ट युवा खेळाडूंना मानसिकरित्या तयार करणे आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘धोनी फिट आहे आणि मला वाटते त्याने भारतासाठी खेळावे’
-१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने केला खूलासा
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मोठे पाऊल; २ आठवड्यांसाठी…