---Advertisement---

टीम इंडियाचा गब्बर जेव्हा देतो सुरेश रैनाला सपोर्ट…

On: शनिवार, मे 9, 2020 6:32 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. क्रिकेटपटू आपल्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी जूने फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. अशामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आपल्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये धवनबरोबर (Shikhar Dhawan) भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनादेखील (Suresh Raina) दिसत आहे. हा फोटो शेअर करत धवनने लिहिले की, “सुरेश पैलवानला सपोर्ट देताना धवन पैलवान.” धवनने या फोटोमध्ये हॅशटॅग फ्लॅशबॅक फ्रायडेचाही वापर केला आहे.

https://www.instagram.com/p/B_7ntiaj_P8/?utm_source=ig_web_copy_link

धवनने शेअर केलेल्या या फोटोत रैना वजनदार डंबल उचलताना दिसत आहे. तर धवन त्याच्या समोर उभा आहे. या फोटोत दोघेही खूप तरूण दिसत आहेत. या दोघांना पाहून ओळखणेही कठीण आहे.

या फोटोला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवर रैनाने कमेंट केली की, “चांगले जुने दिवस, काय त्या आठवणी.”

तसेच गौरव कपूरनेही (Gaurav Kapoor) मजेदार कमेंट करत लिहिले आहे की, “कोण आहेत हे साल काढलेले कोंबडे?”

रैना आणि शिखर हे दोन्हीही खेळाडू २००४मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात एकत्र खेळले होते. हे दोघेही चांगले मित्र आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पुण्यातील क्रिकेट म्युझियमने विकत घेतली पाकिस्तानच्या या खेळाडूची ऐतिहासिक बॅट

-आयपीएलमधील हे १० विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर

-१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने केला खूलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---