सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी उत्सुक आहेत. मात्र, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. कसोटी संघाचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. (Rohit Sharma Ruled Out)
मुंबई येथे सरावादरम्यान त्याच्या डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले. यामुळे तो भारतीय संघासह दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. त्याच्या जागी सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इंडिया ए संघाचा कर्णधार व सलामीवीर प्रियांक पांचाल (Priyank Panchal) याचा १८ सदस्यीय संघात समावेश केला गेला आहे. बीसीसीआय याबाबत अधिकृत ट्विट करत माहिती दिली. (India Tour Of South Africa)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ– विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन