भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी व वन डे मालिकेनंतर त्याने विश्रांती घेतल्याचा निर्णय घेतला होता. त्याने नुकतेच अमेरिका येथील कॅलिफोर्निया या ठिकाणी आपल्या पहिल्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामना कोणता याचा खुलासा केला आहे.
कॅलिफोर्निया येथे रोहितने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने क्रिक किंगडम नावाची क्रिकेट अकादमी सुरु केली. त्यावेळी बोलताना त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामन्याबाबत सांगितले. रोहित म्हणाला,
“सन 2020-2021 वेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातील अखेरचा सामना ब्रिस्बेन येथे खेळला गेला. हा सामना माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामना आहे. संघातील आठ ते नऊ खेळाडू दुखापतग्रस्त असताना, परिस्थिती विरोधात असताना आपल्या युवा खेळाडूंनी पुढे येऊन जबाबदारी घेत एक शानदार विजय मिळवून दिला ही मोठी गोष्ट होती.”
ब्रिस्बेन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना विजय नोंदवला होता. चार सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना अखेरच्या सामन्याआधी जवळपास सर्व प्रमुख खेळाडू दुखापततग्रस्त झालेले. तेव्हा उपलब्ध असणाऱ्या केवळ अकराच तंदुरुस्त खेळाडूंसह भारतीय संघ या सामन्यात उतरलेला. भारतीय संघाने असामान्य इच्छाशक्ती दाखवत अखेरच्या दिवशी दोन गडी राखून हा विजय मिळवलेला. शुबमन गिल व रिषभ पंत या विजयाचे शिल्पकार ठरलेले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ तब्बल 34 वर्षानंतर या मैदानावर पराभूत झाला होता.
(Rohit Sharma Said 2020 2021 Gabba Test Is Best Match Of My Life)
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्तम कोण? विंडीजच्या स्टार खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता सांगितले उत्तर
जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण? पाकिस्तानी खेळाडूने बाबर अन् इम्रान नाही, तर ‘या’ भारतीयाचे घेतले नाव