---Advertisement---

रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”

On: शुक्रवार, ऑगस्ट 11, 2023 10:35 AM
---Advertisement---

आगामी वनडे विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात केले जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केली जाऊ शकते. भारतीय संघात अद्यापही अशा काही जागा आहेत ज्या जागांवर कोणते खेळाडू खेळणार हे निश्चित नाही. स्वतः कर्णधार रोहित शर्मा यांनी देखील आपली जागा नक्की नसल्याचे मोठे विधान केले.

आशिया चषकाआधी रोहित मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलत होता. त्या कार्यक्रमात बोलताना त्याने संघनिवड व संघातील जागांबाबत बोलताना काही विधाने केली. तो म्हणाला,

“सध्या आपले बरेच खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आशिया चषकासाठी अद्याप संघाची निवड झाली नाही. काही खेळाडूंची जागा निश्चित मानली जात असली तरी, कोणालाही संघात थेट जागा मिळत नाही. यामध्ये स्वतः कर्णधार देखील सामील आहे.”

तो पुढे बोलताना म्हणाला, “संघातील कोणाच्या जागेची शाश्वती देता येणार नाही. छातीठोकणे कोणीही सांगू शकत नाही की तू खेळणारच आहे. निवड समितीच्या बैठकीत याची चर्चा होईल. मात्र, टॉप ऑर्डर असो नाहीतर मिडल ऑर्डर सर्वांना संघातील जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे.”

सध्या भारतीय संघात सलामीवीर जागेसाठी कर्णधार रोहितसह शुबमन गिल व ईशान किशन हे पर्याय आहेत. मधला विराट कोहली ची जागा निश्चित दिसत असली तरी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. श्रेयस अय्यर व केएल राहुल यांनी पुनरागमन केल्यास सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन यांना बाकावर बसावे लागू शकते. तर अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांची जागा निश्चित दिसून येत आहे.

(Rohit Sharma Said No One Have Fix Spot In Team India)

महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---