बांगलादेशविरुद्ध भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून पहिला सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. याच सामन्यापासून भारतीय संघाच्या मिशन वर्ल्डकपची सुरुवात होईल. त्याचवेळी मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विश्वचषकाबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
बांगलादेश दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल. भारतातच होणाऱ्या या विश्वचषकासाठी आपला संघ नियोजन करत आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
“ज्यावेळी तुम्ही कोणताही सामना खेळतात तेव्हा ती कोणत्यातरी स्पर्धेची तयारी असते. विश्वचषकासाठी अजून नऊ-दहा महिने शिल्लक आहेत. आम्ही अद्याप इतक्या दूरचा विचार करत नाही. केवळ एक संघ म्हणून काय करायचे यावर आमचे लक्ष असते.”
रोहितने पुढे सांगितले,
“एकाच वेळी अनेक गोष्टींचे नियोजन करणे कधीतरी फायद्याचे ठरत नाही. संघाच्या थिंक टॅंकला हे माहित आहे की, हा प्रवास कसा करायचा आहे. मी आणि प्रशिक्षक राहुल द्रविड जसाजसा विश्वचषक जवळ येईल, तसतसे नियोजन करूच.”
भारतीय संघाने आपला अखेरचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर झालेल्या दोन्ही विश्वचषकांच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विश्वचषकाआधी भारतीय संघाला तब्बल 25 वनडे सामने खेळण्यासाठी मिळणार आहेत. तसेच विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
(Rohit Sharma Said We Not Looking For ODI World Cup Right Now)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली
नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव