५० षटकांच्या वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांना शतकी खेळी करणे खूप अवघड वाटते. मात्र, भारताचा हिटमॅन रोहित शर्माने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३वेळा द्विशतकी खेळी केल्या आहेत. रोहितने आर अश्विनसोबत झालेल्या इंस्टाग्राम लाइव्हवर त्या व्यक्तिविषयी उलगडा केला आहे, ज्यामुळे तो आपले पहिले द्विशतक करण्यात यशस्वी झाला. Rohit Sharma says that ms dhoni helped me in my first double hundred in odi.
रोहित म्हणाला की, “माझ्या पहिल्या द्विशतकामागे एमएस धोनीची महत्त्वाची भूमिका होती. धोनीने त्यावेळी खूप जोर देऊन मला शेवटपर्यंत टिकून राहायचे आहे, असे म्हटले होते. तसेच, मला द्विशतक करण्याची संधी मिळाली आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा, असे म्हणत त्याने मला प्रोत्साहित केले होते.”
रोहित शर्माने २ नोव्हेंबर २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात आपले पहिले द्विशतक केले होते. यावेळी त्याने १५८ चेंडूत २०९ धावा केल्या होत्या. याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “मला कधीच वाटले नव्हते की, मी वनडेत द्विशतक करेन. त्यावेळी मला अजून चांगली फलंदाजी करायची होती. परंतु, दरम्यान थोडासा पाऊस पडला होता.”
“मी धोनीसोबत मिळून ५०व्या षटकापर्यंत फलंदाजी केली होती. यादरम्यान धोनी मला प्रेरित करत होता. धोनी मला म्हणाला होता की, मी रिस्क घेऊन खेळतो. पण, तू ५०व्या षटकापर्यंत खेळावे असे मला वाटते. त्याने मला फक्त प्रेरित केले नाही, तर मला द्विशतक पूर्ण करण्यासाठीही खूप मदत केली,” असे धोनीविषयी बोलताना रोहित म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
या व्यक्तीमुळे मुंबईकर रोहित शर्माला ‘हिटमॅन’ म्हणून लागले…
कामगारांसाठी रस्त्यावर उतरला हा क्रिकेटर, भर उन्हात वाटतोय अन्न
हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी लढतोय फॅन, अचानक या खेळाडूने केला फोन