बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषक 2023 मधील 9 वा सामना अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना 272 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. भारताने या धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 35 षटकांत केला, पण हा सामना चर्चेत राहिला, तो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या मैत्रीमुळे.
तसं तर कायमच रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) यांच्याविषयी अनेक बातम्या येत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे चाहते भिडल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. रोहितचे चाहते विराटला आणि विराटचे चाहते रोहितला कायम कमी लेखताना दिसतात. परंतु मैदानावर पाहिलं, तर काही वेगळंच चित्र पाहायला मिळतं. आपल्याला माहित असेल की, माजी मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, विराट आणि रोहितमध्ये कोणताही वाद नाही. त्यातच विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोघांची मैत्री पाहायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत वेगवान शतक झळकावलं. त्याचं शतक होण्याअगोदरच विराट कोहली (Virat Kohli) ड्रेसिंग रुममध्ये उभा राहिला होता. जसं रोहितने शतक पूर्ण केलं, तसं विराट टाळ्या वाजवत ओरडू लागला. रोहितने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकलं आहे. त्याचबरोबर विश्वचषकात सर्वात (7) जास्त शतक करणारा खेळाडू बनला आहे.
Virat Kohli celebrating Rohit Sharma's century.
Picture of the day….!!! pic.twitter.com/4cVSzZX93z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2023
https://twitter.com/wtf_harshh/status/1712116815856537967
रोहितच्या या शतकीय खेळीने भारताला विश्वचषक 2023 मधील दुसरा विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 272 धावा केल्या होत्या. फलंदाजीसाठी चांगलं खेळपट्टी असल्यामुळे भारताने या लक्ष्याचा पाठलाग 2 विकेट गमावून अवघ्या 35 षटकांत केला. रोहितने सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि पॉवरप्लेमध्येच वैयक्तिक 76 धावा केल्या. त्याने संपूर्ण सामन्यात 84 चेंडूत 131 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. (Rohit Sharma scored a century but Virat Kohli was happy see what happened)
हेही वाचा-
बाहशाह बुमराह! वर्ल्डकपमधील दर्जा कामगिरी सुरूच, असा आहे आजवरचा रेकॉर्ड
भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर ‘क्रिकेटचा देव’ भलताच खुश; म्हणाला, ’14 ऑक्टोबरची…’