---Advertisement---

हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएलच्या ९व्या सामन्यात (आयपीएल २०२१) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नवीन विक्रम रचला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याला मागे सोडले. सनरायझर्स हैद्राबाद विरूद्ध खेळतांना रोहितने हा विक्रम आपल्या नावे केला. याशिवाय कर्णधार म्हणून टी२० मध्ये त्याने ४ हजार धावा देखील पूर्ण केल्या.

हैदराबादविरुद्ध रोहित शर्माने २५ चेंडूत ३२ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. यासह, तो या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या नावे आयपीएल मध्ये एकूण २१७ षटकार झाले. त्याने या विक्रमात एमएस धोनीला मागे सोडले. रोहितने तिस-या षटकात ५व्या चेंडूवर ऑफस्पिनर मुजीब उर रहमानला षटकार ठोकत धोनीच्या २१६ षटकारांची बरोबरी केली. पुढच्या षटकात रोहितने भुवनेश्वर कुमारला षटकार मारत धोनीला मागे सोडले.

या सामन्यापूर्वी रोहित शर्माने २१५ षटकार ठोकले होते. त्याचवेळी धोनीच्या नावावर 216 षटकार होते. सर्वाधिक षटकारांच्या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएलमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम विंडीजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३५१ षटकार लगावले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने २३७ षटकार ठोकले आहेत. हे दोघेही खेळाडू परदेशातील आहेत. २०१ षटकारांसह विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

कर्णधार म्हणून ओलांडला ४ हजार धावांचा टप्पा
रोहित शर्माच्या टी२० मध्ये एकूण ४ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. यासह त्याने आपल्या नावावर आणखी एक कामगिरी केली आहे. तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आपल्या कर्णधारपदाखाली मुंबईला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.

हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात देखील त्याने उत्कृष्ट नेतृत्वाचे प्रदर्शन घडवत मुंबईला सामना जिंकवून दिला. मुंबईने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबाद एकवेळ सुस्थितीत होते. मात्र त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने त्यांच्या डाव १३७ धावांवर संपुष्टात आला. यासह मुंबईने १३ धावांनी सामना खिशात घालत यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.

महत्वाच्या बातम्या:

दोन सामन्यात रोहित बाद होण्यामागे आहे विराटचा हात, वाचा सविस्तर

दीपक चाहरला सीएसकेमध्ये मिळणार नवी जबाबदारी, धोनीने दिले संकेत

MI vs SRH : मुंबईच्या तोफखान्याचा भेदक मारा! हैदराबादला १३७ धावांमध्ये गुंडाळत साकारला हंगामातील दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---